अंबरनाथ : अंबरनाथचे उपशहरप्रमुख राकेश पाटील यांची हत्या ज्या मारेकऱ्यांनी केली त्या मारेक-यांचे वकिलपत्र उल्हासनगर वकिल संघटनेचे कोणतेही सदस्य घेणार नाही याची ग्वाही ज्येष्ठ वकिल छोटू पँथालिया यांनी दिली. समाजातील घातक प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी अशी भूमीका घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मनसेच्या वतीने अंबरनाथच्या रोटीरी सभागृहात राकेश पाटील यांच्यासाठी शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेला संबोधतांना ज्येष्ठ वकिल पँथालिया यांनी राकेशच्या मारेक-यांचे वकीलपत्र उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरातील कोणताच वकील घेणार नाही यासाठी आम्ही आवाहन केले आहे. समाजातील किड नष्ट करण्यासाठी अशी भूमीका ही काळाची गरज आहे. ज्या तरुणाने राजकारणाकडे सकारात्मक दृष्टीकोणातुन पाहिले त्याला संपविण्याचा जो प्रयत्न करण्यात आला आहे त्यासंदर्भात आवाज उचलण्याची गरज आहे.
राकेशच्या मारेक-यांना योग्य शिक्षा होणो हा त्याच्या कुटुंबियांसाठीच महत्वाचे नसुन संपूर्ण अंबरनाथ शहरासाठी महत्वाचे आहे. त्यामुळे आम्ही वकील संघटनेच्या माध्यमातुन प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे मनसे विद्यार्थी सेनेचे उल्हासनगर शहर उपाध्यक्ष अँड. कल्पेश माने यांनी देखील उल्हासनगर बार असोसिएशनला याबाबर पत्र दिले आहे.
दरम्यान या शोकसभेत राकेशच्या स्वभाव आणि त्याच्या कार्यकौशलाची माहीती त्याच्या संपर्कातील पदाधिका-यांनी दिली. राकेशच्या मारेक-यांना योग्य शिक्ष देण्यासाठी प्रत्येकाने प्रय} करण्याची गरज असल्याचे यावेळी भावना व्यक्त करण्यात आली.