शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
3
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
4
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
5
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
6
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
7
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
8
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
9
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
10
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
11
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
12
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
13
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
14
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
15
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
16
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
17
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
18
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
19
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
20
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

Cocaine Drugs Seized: कोकेनची तस्करी करणाऱ्या अफ्रिकन नागरिकाला ठाण्यात अटक

By जितेंद्र कालेकर | Published: August 04, 2022 7:07 PM

२४ लाखांचे कोकेन जप्त, वागळे इस्टेट भागात धरपकड

Cocaine Drugs Seized in Thane | लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: अफ्रिकन देशातून मुंबईत कोकेनच्या तस्करीसाठी आलेल्या कोफी चार्लस उर्फ किंग (सध्या रा. साकीनाका, मेट्रो स्टेशन, मुंबई ) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी गुरुवारी दिली. त्याच्याकडून २४ लाख सहा हजारांचे ६० ग्रॅम कोकेनही जप्त केले आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेट येथील ज्ञानेश्वरनगर भागातील हिंदुस्थान रेसिडेंसी हॉटेल, येथे एक कृष्णवर्णीय व्यक्ती कोकेन या अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती घोडके यांना मिळाली होती. त्याआधारे सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घोडके, सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, अविनाश महाजन, जमादार शशीकांत सालदूर, सुनील अहिरे, हवालदार सुनील रावते, पोलीस नाईक सुनील निकम, तेजस ठाणेकर आणि राहुल पवार आदींच्या पथकाने ३ ऑगस्टला रात्री ८ ४० च्या सुमारास हिंदुस्थान रेसिडेंसी हॉटेल समोरील रस्त्यावर सापळा रचून रिपब्लिक ऑफ आयवोरी कोस्ट या देशातील नागरिक कोफी चार्लस उर्फ किंग याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६० ग्रॅम वजनाचा कोकेन हा अंमली पदार्थ, एक मोबाइल, रिपब्लिक ऑफ आयवोरी कोस्टचा पासपोर्ट आणि विजा असा २४ लाख सहा हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

चार्लस उर्फ किंग हा मूळचा आफ्रिकन देशातील रहिवासी आहे. त्याने त्याच्या एका आफ्रिकन साथीदाराकडून खरेदी केलेल्या कोकेनची तस्करी करण्यासाठी तो ठाण्यात आला होता, अशी कबुलीही दिली आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात एन. डी. पी. एस. कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे. त्याला ९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेDrugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस