- पंकज रोडेकर, ठाणेमुदतबाह्य झालेल्या रिक्षा परवान्यांची संख्या वाढल्याने विविध शुल्क भरून ते परवाने नूतनीकरण करण्याची अभय योजना शासनाने हाती घेतली. या मोहिमेला ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतून अल्प प्रतिसाद लाभल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे २६ हजारांपैकी ४ हजार २८९ रिक्षा परवानाधारकांनी मोहिमेचा लाभ घेतला. त्यामुळे उर्वरित जवळपास २२ हजार १३२ रिक्षा परवाने कायमस्वरूपी बाद ठरले आहेत. त्यांना आता नव्या लॉटरी पद्धतीतही भाग घेता येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. या मोहिमेत १२ कोटी ६४ लाखांहून अधिक रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. सर्वाधिक जास्त दंडवसुली कल्याण विभागातून तर सर्वात कमी वसई विभागातून झाली आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) १९९७ पासून आतापर्यंत जवळपास २६ हजार १३२ हजार रिक्षांचेपरवाने मुदतबाह्य झाले होते. ते परवाने नियमानुसार मुदत संपल्यावर सहा महिन्यांत नूतनीकरण न के ल्यास ते रद्द होतात. अशा प्रकारे रद्द झालेल्या परवानाधारकांचे परवाने नूतनीकरणासाठी शासनाने १आॅक्टोबर ते ३१ नोव्हेंबरदरम्यान विशेष मोहीम राबवली होती. याचदरम्यान, दोन वेळेला वाढीव मुदत दिली होती. तरीसुद्धा, त्याला अल्प प्रतिसाद लाभल्याचे दिसते. या मोहिमेंतर्गत ४ हजार २८९ जणांनी महाराष्ट्र मोटार वाहन नियमातील तरतुदीनुसार दरमहा १०० रुपये भरून परवाने नूतनीकरण केले आहेत. ही मोहीम गरजू परवानाधारक तसेच वृद्ध व निराधार महिलांच्या सोयीसाठी राबवण्यात आली होती.शेवटच्या दिवशी दोन कोटींहून अधिक वसुलीशेवटच्या दिवशी ८१५ परवानाधारकांनी परवाने नूतनीकरण केले आहेत. यामध्ये ठाण्यात ३१९, कल्याण- २१६, नवी मुंबई २३२ आणि वसईत ४८ नूतनीकरणाची संख्या आहे. ८१५ परवानाधारकांक डून दोन कोटी ३३ लाख १७ हजार ३३६ रुपये दंड वसूल केला. नूतनीकरण न करण्यामागची कारणेपरवानाधारकाचा मृत्यू झाला असावा, तसेच त्याची नूतनीकरणाची इच्छा नसावी, आर्थिक अडचणी आदी बाबींची शक्यता नाकारता येत नाही. आरटीओ कारवाईचा तक्ताविभागमुदतबाह्य आॅटो रिक्षाकायमस्वरूपीदंड परवाने नूतनीकरण संख्याबाद परवानेवसुलीठाणे७४९३१४८६६००७३,७१,५४,३९९कल्याण१००५११७७२८२७९६,४२,११,९०८नवी मुंबई५३७३८९०४४८३२,१६,१०,५००वसई३५०४१४१३३६३३४,९६,९०६एकूण२६१३२४२८९२२,१३२१२,६४,७३,७१३युनियनच्या सहमतीने शुल्क निश्चित केले होते. त्यानुसार, शुल्क आकारून नूतनीकरण मोहीम शासनाने राबवली. ज्यांनी याचा लाभ घेतला नाही, त्या उर्वरितांचे परवाने आता कायमस्वरूपी बाद झाले आहेत. तसेच त्यांना नव्या कोणत्याच लॉटरी पद्धतीत सहभागी होता येणार नाही. - विकास पांडकर, आरटीओ अधिकारी, ठाणे
रिक्षांचे २२ हजार परवाने बाद
By admin | Published: December 04, 2015 12:49 AM