बदलापूर - बदलापूर आणि वांगणी दरम्यान असलेल्या चंदरेी किल्लयावर अनेक ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी येत असतात. मात्र गेल्या वर्षभरात ट्रेकिंगसाठी आलेले अनेक ट्रेकर्स हे रस्ता विसरल्याने जंगलात भरकटले आहेत. असाच एक प्रकार रविवारी सायंकाळी घडल्याचे समोर आले होते. बदलापूरहुन चंदरीवर गेलेला ट्रेकर्स जंगलात भरकटल्यावर तब्बल 30 तासानंतर त्याला पनवेलमार्गे उतरविण्यात आले. ट्रेकर्स भरकटण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याने या ठिकाणी ट्रेकर्सला बंदी घालण्याची मागणी पुढे येत आहे.
बदलापूरच्या चंदेरी किल्ल्यावर उदय रेड्डी हा ट्रेकर सकाळी ट्रेकिंगसाठी निघाला. मात्र मध्ये तो रस्ता भरकटल्याने चंदेरी कल्यावर न पोहचता शेजारी असलेल्या म्हैसमाळच्या सुळक्यावर पोहचला. चंदेरी आणि म्हैसमाळ हे दोन्ही सुकळे भिन्न आहेत. मात्र त्याला रस्ता न सापडल्याने तो म्हैसमाळच्या सुळक्यावर पोहचला. उतरण्याचा मार्ग न सापडल्याने तो वरतीच अडुन पडला. अखेर त्याचा शोध घेल्यावर सकाळी त्याचा संपर्क झाला. मात्र म्हैसमाळवरुन त्याला खाली आणण्यासाठी बदलापूर ऐवजी पनवेलचा मार्ग सोपा पडणार असल्याने पनवेलमधील ट्रेकर्सची मदत घेण्यात आली. निसर्गमित्र ट्रेकर्स ग्रुपच्या सदस्यांनी रेड्डी यांना तब्बल 3क् तासानंतर खाली सुखरुप उतरविले. दरम्यान रविवारी दिवसभर आणि रात्री देखील त्याचा शोध घेण्याचा प्रय} स्थानिक पोलीसांनी केला. मात्र विषारी सापांचा वावर जास्त असल्याने ही शोधमोहिम रात्री थांबविण्यात आली होती. मात्र सकाळी पुन्हा ही शोधमोहिम सुरु करण्यात आली होती. सकाळी 10.30 वाजता त्याचा शोध लागल्यावर त्याला खाली उतरविण्यात आले.
- 1 ऑक्टोंबरला 58 वर्षीय राजेंद्र शिंदे हे ट्रेकिंगसाठी चंदरी किल्यावर भरकटले होते. त्यांची 18 तासानंतर सुटका करण्यात आली होती.
- 22 जुलै 2018 रोजी एअर इंडियाचे 6 प्रशिक्षणार्थी विद्यार्थी मुसळधार पावसात अडकलेले होते. त्यांना 22 तासानंतर सुखरुप खाली उतरविण्यात आले होत.