अंबरनाथ : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे बालाजी किणीकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपच्या इच्छुक उमेदवाराने मनसेच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले. या बंडखोरीला २४ तास उलटत नाही, तोच शिवसेनेचे इच्छुक उमेदवार सुबोध भारत यांनीदेखील बंडखोरीचा निर्णय घेतला आहे. बुधवारी मराठी कलाकारांच्या उपस्थितीत ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे अंबरनाथमध्ये भाजपपाठोपाठ शिवसेनेलाही बंडखोरीचे ग्रहण लागले आहे.शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना उमेदवारी मिळताच अंबरनाथमधून इच्छुक असलेल्या अन्य उमेदवारांनी इतर पक्षांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले.भाजपचे इच्छुक उमेदवार सुमेध भवार यांनी मनसेची वाट पकडली. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडे मुलाखत देणारे सुबोध भारत यांनी शिवसेनेत प्रवेश करून या जागेवर दावा केला. मात्र, किणीकर यांना उमेदवारी मिळाल्यावर भारत यांनी आता अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भारत यांनी गायक आणि मराठी कलाकारांना बोलावले असून, तो विषय चर्चेचाठरला आहे.
अंबरनाथमध्ये भाजपपाठोपाठ शिवसेनेलाही बंडखोरीचे ग्रहण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 1:34 AM