डोंबिवली: शनिवारी केंद्र स्तरावरील स्वच्छता सर्व्हेक्षण २०१८ यासंदर्भात कल्याण-डोंबिवली शहरांची पाहणी करण्यासाठी एक विशेष पथक पाहणीसाठी आले होते. महापालिकेच्या सूत्रांच्या माहितीनूसार चार दिवस ते पथक महापालिका क्षेत्रात होते, त्यांनी विविध ठिकाणची पाहणी केली. शनिवारी ते पथक डोंबिवलीत येणार म्हणुन स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते, तर शहरभर डीडीटी पावडरीच्या रांगोळया काढल्या होत्या. सोमवारी मात्र त्या समितीची पाठ फिरताच परिस्थिती जैसे थे झाली असून फेरीवाल्यांनी त्यांची पथारी पसरली होती.त्यामुळे रविवारी ‘लोकमत’च्या हॅलो ठाणेमध्ये डीडीटीच्या रांगोळया, फेरीवाल्यांना सक्तीची रजा या मथळयाखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते ते योग्य असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. सोशल मीडियावरही नागरिकांनी स्पष्टपणे मत मांडली. डोंबिवलीत पूर्वेला रेल्वे स्थानकालगत राथ रोड, एस.व्ही रोड, चिमणी गल्ली, नेहरु रोड, पाटकर रोड आदी सर्व ठिकाणी फेरीवाल्यांनी रविवार रात्रीपासूनच ठाण मांडले होते. सोमवारचा आठवडा कपड्यांचा बाजारदेखिल सकाळच्या वेळेत लागला होता. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकासह अधिका-यांच्या दुटप्पी धोरणांबद्दल नाराजी व्यक्त केली.सोशल मीडियावर युवासेनेचे जिल्हाधिकारी, नगसेवक दिपेश म्हात्रे यांनीही युवासेना फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करणार असे पुन्हा सांगितले. त्यावर काहींनी सत्ताधारी असूनही आंदोलन करावी लागतात, प्रशासनावर सत्ताधा-यांचा अंकुश नाही असे सांगत नाराजी व्यक्त केली. तर त्यावर अवमान याचिकेचा, सवंग प्रसिद्धीचा विषय आल्यावर मात्र लोकप्रतिनिधींनी चुप्पी साधली. मनसेचे नेते, सरचिटणीस राजू पाटील यांनी आंदोलन आयुक्तांविरोधात करणार असाल तर मनसे निश्चितच सहकार्य करेल असा पवित्रा व्यक्त केला.अवमान याचिके संदर्भात विरोधी पक्षेनेते मंदार हळबे म्हणाले की, यासंदर्भात पक्षश्रेष्ठींनी जो अहवाल मागितला होता तो त्यांना दिला असून त्यानूसार ते लवकरच निर्णय घेतील. पण असे असले तरी युवासेना अधिकारी, नगरसेवक दिपेश म्हात्रे यांना सत्ताधारी असूनही आंदोलन करावी लागतात हे हास्यास्पद आहे. ती नौटंकीच म्हणावी लागेल. महापालिकेला विरोधी पक्ष म्हणुन आम्हीच सत्ताधारी असल्यासारखे पर्याय दिले, त्यात टाटा लाईनखालील जागेचा मोठा पर्याय दिला. पण शिवसेनेचेच जेष्ठ नगसेवक त्या प्रस्तावाला विरोध करत आहेत. यावरुनच शिवसेनेला फेरीवाला प्रश्न सोडवण्यात किती स्वारस्य आहे हे स्पष्ट होत असल्याची टिका हळबे यांनी केली.तसेच भाजपाचे नगरसेवक हे प्रभाग समितीमध्ये अधिका-यांना सांगतात की फेरीवाला अतिक्रमण हटाव पथकाचे काम हे कलेक्शन करणे आहे. पण असे सांगून भाजपा देखिल सत्ताधारीच आहे ते या समस्ये संदर्भात पळवाट काढू शकत नाहीत. मनसेच्याच वॉर्डात केवळ फेरीवाला समस्या नसून भाजपाच्या विश्वदीप पवार यांच्या वॉर्डातही ही समस्या आहे. पण त्याबद्दल कोणी ब्र काढत नाही असे का? असा सवालही हळबेंनी केला. तसेच मनसेच्या वॉर्डात जे फेरीवाले आहेत ते काही आताचे नसून ती समस्या निर्माण करायला सत्ताधारीच जबाबदार नाहीत का? असेही ते म्हणाले. पर्याय देऊनही तो स्विकारायचा नाही, स्वत: पर्याय द्यायचा नाही, दुस-याने काम केले तर त्याची दखल घ्यायची नाही अशी विचित्र कोंडी या ठिकाणी झाली असल्याने समस्या कशी सुटायची हा खरच ग ंभीर प्रश्न झाल्याचे हळबे हतबत होऊन म्हणाले.हळबेंनी करुन दाखवावे. फेरीवाल्यांविरोधात कावाई करणे असो की, त्यांचे पुर्नवसन करणे असो जेवढा भाजपाने पाठपुरावा केला तेवढा कोणी केला नसेल, म्हणुनच माझ्या वॉर्डातील पदपथ बघावे किती मोकळे आहेत आणि हळबेंच्या पाटकर रोड, डॉ.राथ रोड आणि एस.व्ही रोड आदी ठिकाणांसह आता चिपळुणकर रोडला लागणारी पाणी पुरीची गाडी या सगळया बाबी नागरिक स्वत: उघड्या डोळयांनी बघत आहेत वेगळे काही सांगायला नको. यातून जो अर्थबोध व्हायचा तो सगळयांना होत असल्याचा प्रतीटोला शिवमार्केटचे नगरसेवक विश्वदीप पवार यांनी लगावला.मंदार हळबे यांच्यावर फेरीवाल्यांच्या शेकडो जणांच्या सभेत जे आरोप झालेत त्याचे काय? पैसे घेतात अशा स्वरुपाचे गंभीर आरोप त्यांच्यावर झाले आहेत. त्यामुळे त्यांनी पक्षिय राजकारण करण्यापेक्षा ही समस्या कशी सोडवली जाईल हे बघावे. त्यांच्याच वॉर्डात सर्वाधिक फेरीवाले आहेत हे तर उघड सत्य आहे की नाही हे का ते मान्य करत नाहीत असा सवाल शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी केला.
स्वच्छ सर्व्हेक्षण 2018 समितीची पाठ फिरताच डोंबिवलीत फेरीवाले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 4:20 PM
शनिवारी केंद्र स्तरावरील स्वच्छता सर्व्हेक्षण २०१८ यासंदर्भात कल्याण-डोंबिवली शहरांची पाहणी करण्यासाठी एक विशेष पथक पाहणीसाठी आले होते. महापालिकेच्या सूत्रांच्या माहितीनूसार चार दिवस ते पथक महापालिका क्षेत्रात होते, त्यांनी विविध ठिकाणची पाहणी केली. शनिवारी ते पथक डोंबिवलीत येणार म्हणुन स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते, तर शहरभर डीडीटी पावडरीच्या रांगोळया काढल्या होत्या. सोमवारी मात्र त्या समितीची पाठ फिरताच परिस्थिती जैसे थे झाली असून फेरीवाल्यांनी त्यांची पथारी पसरली होती.
ठळक मुद्दे मनसेची अवमान याचिकेबाबत पक्षश्रेष्ठी घेणार निर्णय सत्ताधारी युवासेनेचे पदाधिकारी म्हणतात करणार आंदोलन