ठाणे: कळवा येथून मुलूंडच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे साकेत येथील एका झाडावर आदळून तो पलटी झाल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये आलम शौकत शेख (२५) या मजुराच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यु झाला. तर चालकासह १९ जण जखमी झाले. यातील दहा जणांना एका खासगी रुग्णालयात तर उर्वरित जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.रविवारी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास कळव्याहून साकेतमार्गे मुलुंडच्या दिशेने मजुरांना घेऊन जाणाºया टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन आदळला. या घटनेत आलम या मजूराच्या डोक्याला मार लागल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यु झाला. तर मोहम्मद शेख (२६), अब्दुल करीम(२५), हरु न शेख(१९), शाहीद शेख (२७), मोहम्मद ताज (१९), मोहम्मद शेख (३२), चांद अन्सारी (३२), इकबाल सलिम शेख (२६), इब्रान नाकोदा (३९), आहत खान (३०), निलान शेख (१२), अदनान शेख, परवेज खान(२०) आणि मोहम्मद अिसफ(१९) आदी जखमींची नावे आहे. या जखमी मजुरांच्या डोक्याला, छातीला, हाताला, पायाला मार लागला असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. संदिप दरबस्तावर आणि डॉ. निशिकांत रोकडे यांच्या पथकाने तात्काळ रु ग्णांवर उपचार केले. तसेच ज्या रुग्णांना सीटी स्कॅन आणि एमआरआय करण्याची आवश्यक्ता आहे. अशा रु ग्णांना इतर रु ग्णालयात स्थालांतरीत केल्याची माहिती रु ग्णालय प्रशासनाने दिली. दरम्यान, या घटनेत बचावलेल्या मजुराने दिलेल्या माहीती नुसार, मुंबई महापालिका परिसरातील रस्त्यावरील झाडे कापण्यासाठी दररोज ठेकेदारामार्फत पाठवलेल्या वाहनाने आम्ही मुंब्रा येथून जात असतो. त्यानुसार रविवारी देखिल सर्व मजूर कामासाठी निघालो. मात्र, क्षमतेपेक्षा अधिक मजूर या गाडीत होते. त्यामुळे साकेत येथे वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी झाडावर जाऊन आदळली असल्याचे त्याने सांगितले.यातील दहा जणांना एका खासगी रुगणालयात तर नऊ जणांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कापूरबावडी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. अपघातग्रस्त टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला असून चालकाचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी सांगितले. अपघात टेम्पोचा ब्रेक निकामी झाल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे झाला या सर्व बाबींचाही कसून तपास करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे झाडाला धडक बसून टेम्पो पलटी: एक ठार, १९ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 6:54 PM
चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे टेम्पोची झाडाला धडक बसून मुंबई नाशिक मुंबई मार्गावरील साकेतजवळ टेम्पो पलटी झाल्याचे आलम शौकत शेख याचा मृत्यु तर १९ मजूर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. यातील दहा जखमींना खासगी तर नऊ जणांवर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
ठळक मुद्देरविवारी सकाळी झाला अपघातकापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलटेम्पोचा चालकाचाही शोध सुरु