जव्हार : आदिवासी विकास प्रकल्पातील अतिदुर्गम भागातील दुर्लक्षित शिक्षेची शाळा म्हणून वांगणी आश्रम शाळेची गणना केली जात असून, या आश्रम शाळेत मंत्री, आमदार, खासदार यापूर्वी कधीच आले नव्हते. मात्र स्वातंत्र्यानंतर राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी पहिल्यांदाच वांगणी आश्रम शाळेला भेट देवून विद्यार्थ्यांकडून समस्या जाणून घेतल्या आहेत.जव्हार आदिवासी विकास प्रकल्पातील वांगणी आश्रम शाळेत इयत्ता १ ली. ते १० वीपर्यंत ४२५ विद्यार्थी वसतिगृहात निवासी राहून शिक्षण घेत आहेत. द-याखो-यातील वांगणी आश्रम शाळा असून, या शाळेत बदलीने किंव्हा प्रतिनियुक्तीवर येणारा प्रत्येक कर्मचारी वेगळ्या नजरेने बघायचा व काही कर्मचाऱ्यांची वांगणी आश्रम शाळेत बदली केली जायची. मात्र वांगणी आश्रम शाळेने कायापालट करीत शाळेचा चेहरा मोहरा बदलाला आहे.वांगणी आश्रम शाळेला ईमारत नसतांनाही आदिवासी विकास प्रकल्पाची वेळोवेळी केलेली मदत व अधिकारी कर्मचाºयांच्या स्कूल कमिटीच्या नियोजनामुळे शाळेचा चेहरा मोहरा बदल करीत शाळेचा कायापालट करून सुंदर व नयनरम्य आश्रम शाळा बनविली आहे. या वांगणी आश्रम शाळेला सवरा यांनी भेट देवून शाळेची पाहणी केली. तसेच विद्यार्थ्यांबरोबर सवांद साधून शैक्षणिक, डीबीटी, आश्रम शाळेच्या अन्य समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी प्रकल्प स्तरीय समिती अध्यक्ष हरिश्चंद्र भोये, जि. प. सदस्य अशोक भोये, नगरसेवक कुणाल उदावंत, आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्यानंतर मंत्र्यांची प्रथमच शाळेला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 10:58 PM