शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

आमदारांच्या पाहणीनंतरही परिस्थिती ‘जैसे थे’

By admin | Published: June 21, 2017 4:26 AM

कल्याण स्टेशन परिसरातील फेरीवाले, वारांगना आणि गदुल्ले यांंच्याकडून प्रवाशांना होत असलेल्या तक्रारी वाढू लागल्याने सत्ताधारी भाजपा आ. नरेंद्र पवार यांनी पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण स्टेशन परिसरातील फेरीवाले, वारांगना आणि गदुल्ले यांंच्याकडून प्रवाशांना होत असलेल्या तक्रारी वाढू लागल्याने सत्ताधारी भाजपा आ. नरेंद्र पवार यांनी पाहणी करून पंधरा दिवसात सुधारणा दिसून आली नाही; तर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. फेरीवाल्यांनी स्टेशन परिसरात पुन्हा बस्तान बसविले. त्यांच्याविरोधात संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाईच केली नसल्याने आमदारांच्या इशाऱ्यालाही अधिकारी जुमानत नसल्याचे, त्यांच्यात आणि फेरीवाल्यांत साटेलोटे असल्यानेच फेरीवाल्यांना कारवाईची भीती उरली नसल्याचे चित्र पुन्हा एकदा या निमित्ताने समोर आले आहे. फेरीवाल्यांविरोधात तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी मोहीम उघडून स्टेशन परिसर मोकळा करण्याचा प्रयत्न केला. स्टेशन परिसरात भाजपाच्या स्वप्नातील स्मार्ट सिटीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरु करायचा आहे. स्टेशन परिसर मोकळा करणे हा स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाच्या यादीतील प्रमुख प्रकल्प असून त्याला महापालिकेने प्राधान्य दिले आहे. रवींद्रन यांच्या कारवाईला फेरीवाल्यांचा विरोध झाला. फेरीवाल्यांनी महापालिकेच्या विरोधात मोर्चे काढले. त्यातच पालिकेच्या अधिकाऱ्यांनीही रवींद्रन यांना पुरेशा साथ दिली नाही. त्यामुळे कारवाईत सातत्य राहिले नाही. डोंबिवलीत सत्ताधारी शिवसेनेने फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केले. नंतर पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे दर सोमवारी उपोषण करत आहेत. त्यापूर्वी मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांनीही उपोषण केले. तरीही ना डोंबिवलीतील फेरीवाल्यांचा प्रश्न सुटला, ना कल्याणमधील. खासदारांनी पाहणी केली. नंतर आमदारांनी पाहणी केली, तरीही फेरीवाल्यांचा प्रश्न सुटत नाही. यात पालिकेची भूमिका महत्त्वाची आहे. रेल्वे पोलिस, सुरक्षा बलाचे जवान आणि पालिका अधिकारी हद्दीचा प्रश्न पुढे करत असल्याने त्यांच्या संयुक्त कारवाईचे प्रयत्न झाले. पण त्यालाही फेरीवाल्यांची यंत्रणा पुरून उरली. आता तर सत्ताधारी आमदाराने इशारा देऊनही या प्रश्नात एकही यंत्रणा हलली नाही, यातूनच या प्रश्नाबद्दल सर्वांना किती आस्था आहे, याची कल्पना यावी.