शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

केतकीनंतर नितीन भामरेही ठाणे पोलिसांच्या ताब्यात, शरद पवारांवरील पोस्ट भोवली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 3:43 PM

निखिल भामरेला आज ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याला नाशिक कोर्टात आणले असताना ठाणे क्राईम ब्रँचने त्याचा ताबा घेतला आहे

ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. एकीकडे केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावली असताना गोरेगाव पोलिसांनी आज तिचा ताबा घेतला आहे. तर, दुसरीकडे नाशिक पोलिसांच्या ताब्यात असलेल्या निखील भामरेचा ठाणे पोलिसांनी ताबा घेतला आहे. निखील भामरेनेही शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली होती.  

निखिल भामरेला आज ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याला नाशिक कोर्टात आणले असताना ठाणे क्राईम ब्रँचने त्याचा ताबा घेतला आहे. ठाणे पोलिसांकडून निखिलला उद्या न्यायालयात हजर करण्यात येईल. दरम्यान, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निखील भामरेच्या ट्विटचा फोटो शेअर करत त्याच्यावर कारवाईची मागणी केली होती. 

निखिल भामरे नावाचा एक तरुण बागलाणकर या युजरनेमचा वापर करून केलेलं आक्षेपार्ह ट्विट होतं. जितेंद्र आव्हाड यांनी या ट्विटचा स्क्रीनशॉट ट्विटरवरुन शेअर केला होता. या ट्विटमध्ये लिहिलं होतं, "वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची. #बाराचा_काका_माफी_माग." या ट्विटवरून जितेंद्र आव्हाडांनी महाराष्ट्र पोलिसांना टॅग करत कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर, ठाणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या तक्रारीनंतर निखिल भामरे विरोधात ठाणे पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

केतकी गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सामाजिक माध्यमांवर प्रसारित केलेल्या पोस्टप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महत्वाची बाब म्हणजे ठाणे सत्र न्यायालयात केतकीच्या सुनावणीवेळी गोरेगाव पोलीस देखील तिचा ताबा घेण्यासाठी पोहोचले होते. गोरेगाव पोलिसांनी केतकीच्या कोठडीची मागणी केली. न्यायालयाकडून कोठडी देण्यात आली असून गोरेगाव पोलीसांनी केतकीचा ताबा घेतला आहे. आता गोरेगाव पोलीस मुंबईकडे रवाना झाले आहेत. 

टॅग्स :Ketaki Chitaleकेतकी चितळेCrime Newsगुन्हेगारीSharad Pawarशरद पवारthaneठाणेPoliceपोलिस