ठाणे - काही दिवसांपूर्वी मंजुर नसलेल्या रेल्वे पादपाची भुमीपुजनाच्या मुद्यावरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा वाद विकोपाला गेला होता. त्यानंतर आता कळवा - खारेगावला जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या शुभारंभाच्या मुद्यावरुन सुध्दा शिवसेना, राष्ट्रवादीत श्रेयाची लढाई सुरु झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळीच या पुलाचा शुभारंभ शिवसेनेने उरकून घेतला होता. परंतु शनिवारी पुन्हा त्याच रेल्वे पादचारी पुलाचा शुभारंभ राष्ट्रवादीने केला. त्यामुळे येत्या काळात शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी असा सामना कळव्यात चांगलाच रंगणार असल्याचे सध्या तरी दिसत आहे.कळवा-खारीगाव पूर्व -पश्चिमेला जोडणारा पादचारी पुलाचा शुभारंभ शुक्रवारी सांयकाळी शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते संपन्न झाला होता. वारंवार होणाऱ्या अपघातामुळे येथे पादचारी उभारण्यासाठी खासदार श्रीकांते शिंदे यांनी या पुलाची मागणी केल्याचा दावा शिवसेनेने केला. परंतु आता त्याच पुलाचा शुभारंभ राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत या पुलाच्या अपघातात दगावलेल्या मुलींच्या आईनेच आव्हाड यांच्या उपस्थितीत उद्घाटन केले. ईश्वर नगर - इंदिरा नगर, सर्वेश्वर सोसायटीजवळ रेल्वे रु ळांवर पादचारी पुल नसल्यामुळे नागरिकांना रु ळ ओलांडावे लागत होते. या ठिकाणी रेल्वे रु ळ ओलांडताना श्वेता आणि कांचन आनंद दाखणिकर या दोन मुलींचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर आ. जितेंद्र आव्हाड यांनी या ठिकाणी पूल उभारावा, या मागणीसाठी प्रचंड मोठा रेल रोको केला होता. त्यावेळी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी आ. आव्हाड यांची भेट घेऊन या ठिकाणी पूल उभारण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. हा पुल पूर्ण झाला असून शनिवारी सकाळी ११ वाजता आव्हाड, श्वेता आणि कांचन यांची मातोश्री पुष्पा आनंद दाखणिकर यांनी या पुलाचे उद्घाटन केले. यावेळी शहराध्यक्ष आनंद परांपजे, विरोधी पक्षनेते मिलींद पाटील, नगरसेवक प्रकाश बर्डे, महेश साळवी, नगरसेविका वर्षा मोरे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. आव्हाड यांनीसुध्दा अशा प्रकारे दावा केल्याने नेमका पुल कोणाच्या पाठपुराव्यामुळे झाला, याबाबत मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.
रेल्वेच्या एकाच पादचारी पुलाचा दोनदा शुभारंभ, शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीनेही फोडला नारळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 4:31 PM
कळव्यातील रेल्वे पादचारी पुलाच्या मुद्यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत श्रेयाची लढाई सुरु झाली आहे. शुक्रवारी या पुलाचा शुभारंभ शिवसनेने केला असतांना शनिवारी राष्ट्रवादीने सुध्दा या पुलाचा पुन्हा शुभारंभ केला आहे. या दोघांनी ही आपल्यामुळेच हा पुल झाल्याचा दावा केला आहे.
ठळक मुद्देमोठ्या संघर्षानंतर पुल झाला तयार - राष्ट्रवादीचा दावाश्रेयाची लढाई सुरु