डोंबिवली: खड्डयांच्या बळींमुळे कल्याणकर नागरिकांमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेविरोधात संतापाची भावना आहे. त्यातच गेले आठवडाभर विविध कारणांमुळे कल्याणमध्ये दिवसंरात्र वाहतूक कोंडी असल्याने त्रस्त कल्याणकरांनी कोणाकोणाला जबाबदार धरायचे असा सवाल करत हतबलता व्यक्त केली. बुधवारीही सलग सहाव्या दिवशी कल्याणमधील वाहतूक कूर्मगतीने पुढे सरकल्याचा फटका अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांना, महापालिकेच्या परिवहन विभागाला, तसेच खासगी वाहनचालकांना बसला.वाहतूक नियंत्रण विभागासह आरटीओच्या दुर्लक्षामुळे कल्याणमध्ये वाहतूक कोंडी होत असल्याची टिका वाहनचालकांनी केली. नियमबाह्य वाहतूकीवर यंत्रणेचा प्रतिबंध नसल्याने त्याचा त्रास कल्याणकरांना होत आहे. मुंब्रा बायपासची वाहतूक कल्याणमार्गे वळवल्याने कल्याणमध्ये वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. आग्रा रोड, सहजानंद चौक, गोविंदवाडी बायपास, दुर्गाडी चौक , भिवंडी रोड, वायले नगर यासह जून्या कल्याणमधील चिंचोळया रस्त्यांच्या परिसरात सर्वत्र वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कल्याण रेल्वे स्थानकानजीक असलेल्या राज्य परिवहनच्या बस स्टँडमध्ये ये-जा करणा-या बस चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे लागले. त्यामध्ये रिक्षा टेम्पो, मोठे टेम्पो, ट्रक टेम्पो, ट्रक, डंपर यासह अन्य राज्य परिवहन व खासगी बसेस, रिक्षा, चार चाकी वाहने, दुचाकीस्वार आदींमुळे पत्रीपूल ते शिवाजी चौक, पुढे महापालिका मुख्यालय, आग्रा रोड गाठण्यासाठी तासभराचा अवधी लागला.* वाहतूक कोंडीचा सर्वात जास्त फटका महापलिकेच्या परिवहन विभागाला बसला आहे. परिवहनचे उत्पन्न ६ लाखांवरून आता थेट साडेचार लाखांवर आले आहे. पंधरवड्यापासून ही समस्या प्रकर्षाने भेडसावत आहे. त्यामुळे दिवासाला लाख-दिड लाखांची तूट होत आहे. जेथे दिवसाला परिवहनच्या ७० बसेस विविध मार्गावर १६ हजार कि.मी. धावयाला हवीत ती कोंडीमुळे १२ ते १३ हजार कि.मी धावत असल्याची माहिती परिवहनचे नियोजन अधिकारी संदीप भोसले यांनी ‘लोकमत’ला दिली.
खड्डयांपाठोपाठ वाहतूक कोंडीने कल्याणकर त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 3:59 PM
खड्डयांच्या बळींमुळे कल्याणकर नागरिकांमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेविरोधात संतापाची भावना आहे. त्यातच गेले आठवडाभर विविध कारणांमुळे कल्याणमध्ये दिवसंरात्र वाहतूक कोंडी असल्याने त्रस्त कल्याणकरांनी कोणाकोणाला जबाबदार धरायचे असा सवाल करत हतबलता व्यक्त केली. बुधवारीही सलग सहाव्या दिवशी कल्याणमधील वाहतूक कूर्मगतीने पुढे सरकल्याचा फटका अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांना, महापालिकेच्या परिवहन विभागाला, तसेच खासगी वाहनचालकांना बसला.
ठळक मुद्दे परिवहनच्या उत्पन्नात प्रतीदिन दिड लाखांची घट पत्रीपूलावर अवजड वाहनांच्या रांगाच रांगा