शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

...शोध दहावीनंतरच्या करिअर संधींचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 4:07 AM

दहावीचा निकाल नुकताच लागला आहे. दहावी हा शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा. यानंतर तुम्ही कोणते क्षेत्र किंवा दिशा निवडता, यावर तुमचे भविष्य बऱ्याच प्रमाणावर अवलंबून असते.

दहावीचा निकाल नुकताच लागला आहे. दहावी हा शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा. यानंतर तुम्ही कोणते क्षेत्र किंवा दिशा निवडता, यावर तुमचे भविष्य बऱ्याच प्रमाणावर अवलंबून असते. आज आपण दहावीनंतर कोणती क्षेत्रे प्रामुख्याने निवडली जातात त्याचा आढावा घेणार आहोत.सायन्स (विज्ञान शाखा)विज्ञान हे अभ्यास आणि प्रयोगांमधून मिळवलेले ज्ञान आहे. या क्षेत्रात अनेक उपशाखा आहेत.१) इंजिनीअरिंग :इंजिनीअरिंग ही शाखा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून विविध यंत्रे बनविणे आणि त्याचा उत्तम वापर करण्याचे विविध मार्ग दर्शवते. ही एक मोठी शाखा आहे ज्याच्या अनेक उपशाखा आहेत, त्यातील केमिकल, मेकानिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल या ४ महत्त्वाच्या शाखा आहेत.२) आर्किटेक्चर :या क्षेत्रात विविध स्थापत्य रचना आणि इमारती यांची संकल्पना आणि बांधकाम यांचा अभ्यास केला जातो. वास्तुरचनाकार इमारती, खासगी निवासस्थाने, कारखाने, मॉल, कार्यालय, व्यावसायिक इमारती आणि इतर बांधकामे यांची संरचना करतो. संरचना करताना त्याचा वापर करणाºया लोकांच्या गरजा, कार्यक्षमता, सुरक्षा या गोष्टी लक्षात ठेवतो.आर्किटेक्ट म्हणून तुम्ही आराखडे बनवण्यात उत्तम असणे गरजेचे आहे. तुमचे संख्याज्ञान आणि गणित चांगले असावे, उत्तम कल्पनाशक्ती, विश्लेषण क्षमता आणि निरीक्षण असणेही आवश्यक आहे.३) कॉम्प्युटर आणि आय.टी. :कॉम्प्युटर सायन्स (सी.एस.) हे संगणकाचा अभ्यास, डिझाइन, प्रणाली विकसित करणे, चाचण्या आणि संगणक हार्डवेअर, सर्किट बोर्ड, की बोर्ड, राउटर, प्रिंटर आणि इतर संगणक यंत्रणा कार्यान्वित करण्यात मदत करते. माहिती तंत्रज्ञान ही इंजिनीअरिंगची शाखा आहे जी कॉम्प्युटरमध्ये माहिती साठविणे, माहिती परत मिळविणे आणि माहिती प्रक्षेपित करणे याच्याशी संबंधित आहे. आयटी ही संगणकाचा आणि सॉफ्टवेअरचा वापर करून माहितीचे व्यवस्थापन करते.४) प्युअर सायन्स :प्युअर सायन्स म्हणजे विज्ञानाचा तर्कशुद्ध अभ्यास आणि त्याचा विकासासाठी उपयोग करणे. या क्षेत्रात खालील विषयांचा अभ्यास केला जातो - केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी, ओशिअनोग्राफी, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी आदी.५) मेडिसिन :हे क्षेत्र आजारांचे निदान, उपचार आणि निवारण करण्याशी संबंधित आहे. या क्षेत्रात जनरल मेडिसिन, सर्जरी, डेन्टीस्ट्री, अलोपथी, आयुर्वेद, नेचरोपथी, होमिओपथी, युनानी, वेटनरी सायन्स आदी विशेष शाखा आहेत. पॅरामेडिकल ही शाखा मेडिकलला आधार देणारी उपशाखा आहे. यामध्ये फिजिओथेरपी, नर्सिंग, स्पीच थेरपी, फार्मसी, मेडिकल टेक्निशिअन या क्षेत्रांचा समावेश होतो.६) कमर्शिअल पायलट :हे विमानचालक प्रवासी आणि वस्तूंची वाहतूक करतात. कमर्शिअल पायलट म्हणून तुम्ही पायलट किंवा को-पायलट म्हणून देश किंवा आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक करता.७) मर्चंट नेव्ही :मर्चंट नेव्ही म्हणजे व्यापारी जहाजांची वाहतूक करणे. जसे माल वाहतूक आणि क्वचित प्रवाशांची वाहतूक. या क्षेत्रात समुद्र यात्रा करता येतात; परंतु त्याचबरोबर मेहनत करावी लागते. तसेच कुटुंबापासून प्रदीर्घ काळासाठी दूर राहावे लागते.कॉमर्स (वाणिज्य शाखा)जर तुमचे गणित, संख्याज्ञान चांगले आहे. तुम्हाला उद्योगधंद्याची आणि जागतिक अर्थज्ञानाची चांगली समज आहे. तुमचा तर्कवितर्क (लॉजिक आणि अ‍ॅनालिसिस) चांगला आहे. जर तुमच्यात नियोजन क्षमता आणि सातत्य आहे, तर या शैक्षणिक क्षेत्राची निवड करणे योग्य ठरेल. या क्षेत्रात अनेक उपशाखा आहेत.१) अकाउंट्स -अकाउंटसी म्हणजे उद्योगाचे यश किंवा अपयश समजून घेण्यासाठी त्यात होणाºया रोजच्या आर्थिक उलाढालींची नोंद ठेवणे. अकाउंटंट म्हणून आॅडिट, कंपनी बजेट, टॅक्सेशन इ. कामे तुम्हाला पार पाडावी लागतील.जॉब टायटल झ्र उअ, उहअ/उटअ, उढअ, उकअ इ.२) फायनान्स - फायनान्स म्हणजे पैसे, इन्व्हेस्टमेंट, सिक्युरिटी अशा गाष्टींची काळजी घेणे. या क्षेत्रात तुम्हाला जागतिक बाजारपेठ, अर्थज्ञान, परदेशी गुंतवणूक या गोष्टींची माहिती आणि संशोधन करावे लागेल.जॉब टायटल - उऋढ, उऋअ, स्टोक ब्रोकर, फोरेक्स डीलर.३) बँकिंग आणि इन्शुरन्स -इतरांचे पैसे काळजीपूर्वक आणि सुरक्षित ठेवून त्यांचा विनियोग नफा मिळविण्यासाठी करणे. या क्षेत्रात तुम्ही लोन, म्युच्युअल फंड, बॉण्ड्स, इन्शुरन्स पॉलिसी याविषयी कामे कराल.जॉब टायटल - प्रोबेशन आॅफिसर, कॅशियर, इन्वेस्टमेंट बँकर, फोरेक्स डिलर, लोन आॅफिसर, इन्शुरन्स एजंट.४) मॅनेजमेंट - मॅनेजमेंट म्हणजे हाती असलेल्या साधनांचा किंवा माहितीचा परिपूर्ण आणि प्रभावी वापर करून उद्देशपूर्ती करण्यासाठी विविध लोकांना एकत्रित करून काम करणे. मॅनेजर म्हणून तुम्ही एखाद्या प्रकल्पाचा आराखडा मांडणे, त्यानुसार तो प्रकल्प कार्यान्वित करून, पूर्ण करण्याचे काम करणे.जॉब टायटल - सेल्स आणि मार्केटिंग मॅनेजर, एच. आर. एक्झिक्युटिव्ह, ब्राँड मॅनेजर, आॅपरेशन मॅनेजर, रिटेल मॅनेजर, फायनान्शिअल मॅनेजर, इव्हेंट मॅनेजर.कला (आर्ट्स) शाखाअत्यंत विस्तीर्ण अशी असलेली शाखा म्हणजे कला शाखा. ही शाखा खालीलप्रमाणे विभागलेली आहे.१) ह्युमॅनिटी :सायाकोलॉजी, सोशिओलॉजी, आर्किओलॉजी, एन्थ्रोपोलॉजी, हिस्ट्री, जिओग्राफी, टीचिंग, सोशल वर्क, लायब्ररी सायन्स, मास कम्युनिकेशन, इकोनॉमिक्स.२) फाईन आटर््स आणि डिझायनिंग : पेंटिंग, स्क्लपटिंग, आर्टिस्ट, व्हिज्युअल आटर््स, फोटोग्राफी, अ‍ॅनिमेटर, इंटेरिअर डिझायनर, एक्झिबिशन डिझायनर, फॅशन डिझायनर, म्युझिक, डान्स इत्यादी.३) कायदा (लॉ) - वकील किंवा वकील प्रतिनिधी जो आपल्या आशिलाचे (व्यक्ती किंवा व्यवसाय) न्यायालयापुढे प्रतिनिधित्व करतो, ज्यामध्ये कायदेशीर सिद्धान्त आणि व्यावहारिक ज्ञान यांचा वापर करून विविध समस्यांची उकल केली जाते. काही वकील कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करतात तर काही वकील न्यायालयात काम करून कायदेशीर केसेस हाताळतात, विविध समस्यांसाठी विविध न्यायालये आहेत; पण कोणत्याही प्रकारची केस हाताळण्यासाठी छछइ ही पदवी घेणे आवश्यक आहे.अन्य क्षेत्रेडिफेन्स : हे एक सन्मानपूर्ण क्षेत्र आहे. यामध्ये इंडियन आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स यांचा समावेश होतो.सिव्हिल सर्व्हिस : आपल्या देशाच्या लोक प्रशासनाची जबाबदारी यांच्यावर असते.हॉस्पिटॅलिटी - हॉटेल मेनेजमेंट, ट्रॅव्हल टुरीझम, वेलनेस.मास मीडिया - पत्रकारिता, जाहिरातक्षेत्र, इव्हेंट मॅनेजमेंट, पी. आर. इत्यादी.वेगळी क्षेत्रे - कार्टुनिस्ट, टॅटू आर्टिस्ट, रेडिओ जॅकी, अ‍ॅनिमल ट्रेनर, मेकअप आणि हेअर स्टायलिस्ट, अरोमा थेरपिस्ट, बारटेंडर इत्यादी.

टॅग्स :Studentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र