शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

चहाचा घोट घेऊन ‘ती’ गेली उडी मारायला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:00 AM

महिला डॉक्टरची आत्महत्या : कौटुंबिक वाद, ताणतणाव की आर्थिक संकट हे कारण?

- सचिन सागरे

कल्याण : रोज सकाळी फिरायला बाहेर पडणाऱ्या आपल्या सासू-सासºयांना डॉ. प्राजक्ता यांनी चहा करुन दिला. त्यानंतर ते दोघे फिरायला बाहेर पडले. प्राजक्ता यांनी स्वत: एक कप चहा घेतला. त्या कपातील केवळ घोटभर चहा त्यांनी घेतला आणि राहत्या इमारतीच्या आठव्या मजल्यावर जाऊन उडी मारुन आत्महत्या केली. डॉ. प्राजक्ता यांचे असे अचानक मृत्यूला कवटाळणे हे पोलिसांकरिता गूढ आहे.

कौटुंबिक वादातून अथवा मानसिक अस्थैर्यातून किंवा नात्यातील गुंतागुंतीतून हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र सोसायटीमधील काही रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, एका हसत्या खेळत्या आणि सुखवस्तू घरातील डॉ. कुलकर्णी यांच्या आत्महत्येमुळे हायप्रोफाईल महावीर हाईट्स या सोसायटीला मानसिक धक्का बसला आहे.

पश्चिमेतील खडकपाडा परिसरात ही सोसायटी आहे. या सोसायटीमधील एच २ या इमारतीमध्ये तिसºया मजल्यावर डॉक्टर प्राजक्ता कुलकर्णी या पती प्रणव तसेच, ७ आणि २ वर्षीय मुलांसोबत मागील ७ वर्षांपासून राहत आहेत. त्यांच्यासोबतच प्रणव यांचे आईवडिल राहत आहेत. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे प्राजक्ता यांचे सासूसासरे मॉर्निंग वॉकला जाण्यास निघाले. दररोज गरमपाणी पिऊन घराबाहेर पडणाºया सासºयांना प्राजक्ता यांनी चहा पिण्याचा आग्रह केला. सुनेच्या आग्रहाखातर त्यांनी चहा घेतला आणि ते दोघे बाहेर पडले. त्यानंतर प्राजक्ता यांनी स्वत: एका कपात चहा घेतला. त्या कपातील घोटभर चहा घेतल्यानंतर त्या घराबाहेर पडल्या आणि लिफ्टने आठव्या मजल्यावर गेल्या. प्राजक्ता आठव्या मजल्यावर असलेल्या लॉबीमध्ये गेल्या आणि तिथून उडी घेऊन आत्महत्या केली. यावेळी, त्यांचे पती प्रणव आणि दोन मुले घरात झोपली होती.मुलाच्या सहलीची केली तयारीप्राजक्ता यांच्या दुसरीत शिकणाºया ७ वर्षीय मोठ्या मुलाच्या शाळेची मंगळवारी सकाळी ९ वाजता सहल जाणार होती. प्राजक्ता यांनी त्याच्या सहलीची तयारी केली होती. मात्र, त्या चिमुरड्यावर आईच्या आत्महत्येमुळे आभाळ कोसळले. प्राजक्ता यांची अंत्ययात्रा निघाली तेव्हा त्यांच्या दोन्ही मुलांनी फोडलेल्या हंबरड्यामुळे उपस्थितांचे काळीज पिळवटून निघाले.एकाच पंख्याला गळफास घेऊन दोन मैत्रिणींची आत्महत्याडोंबिवली : एकाच पंख्याला एकाच ओढणीने गळफास घेऊन दोन मैत्रिणींनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना कोळेगावात मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेचे नेमके कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. ऋतुजा साहेबराव कोल्हे (१४) आणि वर्षा चिंतामन पाटील (२७) ही आत्महत्या केलेल्या मैत्रिणींची नावे आहेत. बदलापूर पाईपलाईन रोडला या दोघी शेजारी-शेजारी राहायला आहेत. वर्षा पाटील ही घटस्फोटीत आहे. कोळेगावातील समर्थकृपा इमारतीमध्ये ती आई-वडिलांसोबत राहायची. ऋतुजा ही तिचे आई-वडिल आणि लहान भावासोबत शेजारी भाड्याच्या खोलीत राहायची. सोमवारी नेहमीप्रमाणे ऋतुजा भावाला सोबत घेऊन वर्षाच्या घरी झोपायला गेली. पहाटे पाचच्या सुमारास ऋतुजाच्या भावाला शाळेत नेण्यासाठी त्याची आई बोलवायला आली. आई आल्यामुळे जाग आलेल्या तिच्या भावाला स्वयंपाक घरातील पंख्याला या दोघींचे मृतदेह एकाच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. ही घटना वाºयासारखी गावात पसरली. एकाचवेळी दोघींनी आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर गावात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या दोन्ही मैत्रिणींनी आत्महत्या का केली, याबाबतचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :doctorडॉक्टर