शहापूर : तालुक्यातील लवले, नांदवळ, बाभळे, चिखलगाव आणि कानवे पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी दाखल ४७ अर्जांची मंगळवारी छाननी करण्यात आली. या पाच पैकी लवले आणि नांदवळ या दोन ग्रामपंचायतींसाठी एकही अर्ज झालेला नाही. त्यामुळे या वेळी देखील तेथे प्रशासकाची नियुक्ती होणार आहे. संजय सानप, एन. बी भजे, आणि रामचंद्र विशे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.२० वर्षांपासून या दोन ग्रामपंचायतींवर प्रशासकाचीच नेमणूक होत आहे. हा तालुका अनुसूचित जाती- जमातींसाठी राखीव असल्याने ५० टक्के जागा राखीव ठेवावी लागते. मात्र, गावांमध्ये अनुसूचित जमातीची पुरेशी लोकसंख्या नसल्याने या दोन्ही ग्रामपंचायतीसाठी एकही अर्ज प्राप्त होत नाही .बाभळे ग्रामपंचायतीच्या सात सदस्य जागेसाठी अर्ज आले असले तरी सरपंचपदाच्या जागेसाठी कोणीच उमेदवारी अर्ज भरलेला नाही. तर कानवे येथे सरपंच पदासाठी चार तर सदस्य म्हणून २२ असे एकूण २६ अर्ज आले आहेत. त्यातील सरपंचपदासाठीचा एक तर सदस्यांचे तीन अर्ज बाद झाले आहेत. कारण अर्जदारानी जात पडताळणीसाठी योग्य कागदपत्रे सादर केली नाहीत.चिखलगाव या ग्रामपंचायतीसाठी तीन सरपंच आणि ११ सदस्य असे एकूण १४ अर्ज आहेत.६ उमेदवारांचे मालमत्ता विवरण पत्र बोगस; ग्रामपंचायत निवडणूक; अर्जांची छाननीमुरबाड : तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी सादर केलेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी मंगळवारी झाली. यात ११ ग्रामपंचायतीच्या उमेदवारांनी कोणावर हरकत न घेता सरळ लढतीची तयारी दाखवली. मात्र, भादाणे येथील जवळपास सहा उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रात सादर केलेले मालमत्ता विवरण पत्र हे बोगस असल्याचे लक्षात आले. विरोधी उमेदवार महेश हंडोरे यांनी याला आक्षेप घेतला. तसेच डोंगरन्हावे येथील गौरी गणेश गायकर यांनी मतदार यादीतील नावात बदल करून उमेदवारी अर्ज सादर केल्याची हरकत घेतल्याने त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे.१६ आॅक्टोबर रोजी होणाºया निवडणुकीसाठी मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी सरपंच पदासाठी सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपली वर्णी लागावी म्हणून गावागावात मोर्चबांधणी केली आहे. सासणे, कान्होळ, आंबेळे, भादाणे, वैशाखरे, आसोळे, साकुर्ली, किशोर, डोंगरन्हावे, खोपिवली, माळ, तोंडली, माळ, मोहघर या १३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी तब्बल ५४ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. भादाणे ग्रामपंचायतीच्या ६ या उमेदवारांनी अर्जात मालमत्तेचे विवरण चुकीचे सादर केल्याची हरकत महेश हंडोरे या उमेदवाराने घेतली. तसेच या या उमेदवारांचे अर्ज बाद करावे अशी मागणी केली आहे. डोंगरन्हावे येथील गोरी गणेश गायकर या उमेदवाराने देखील उमेदवारी आर्जात मतदार यादीतील नावाचा समावेश न करता वेगळ्या नावाने अर्ज सादर केल्याची हरकत घेतली आहे.
दोन ग्रामपंचायतीवर पुन्हा प्रशासकच , पाच ग्रामपंचायतींमध्ये लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 1:38 AM