वसई : वसई-विरार महापालिकेतून गावे वगळण्यासाठी ग्रामस्थांनी २००९ प्रमाणे पुन्हा एकत्र यावे, असे आवाहन जन आंदोलन समितीने निर्मळ येथील चौक सभेत केले.महापालिकेतून २९ गावे वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, त्यानंतर या निर्णयात बहुजन विकास आघाडीने खो घालून गावे महापालिकेतच राहू दिली. आता तर उर्वरीत २१ गावेही महापालिकेत समाविष्ट करावीत अशी मागणी आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर आणि विलास तरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे गावांचे अस्तित्व नष्ट होवून घर बांधण्यासाठीही ग्रामस्थांना महापालिकेकडे याचना करावी लागणार आहे. त्यामुळे २००९ सारखे सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन निर्मळ येथील एका चौक सभेत करण्यात आले.जन आंदोलनाचे कार्याध्यक्ष मिलींद खानोलकर, शिवा किणी, टोनी डाबरे, सुनील डिसील्वा, समीर वर्तक, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजय पाटील, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते विनायक निकम, संजय कोळी, उदय चेंदवणकर, डॉमनिका डाबरे, विन्सेंट परेरा, टेंभी-कोल्हापुरच्या सरपंचा पूजा घोडविंदे आदि पदाधिकारी या सभेला उपस्थित होते.
गावे वगळण्यासाठी पुन्हा संघर्ष
By admin | Published: December 21, 2015 11:38 PM