मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी काही दिवसांपासून विविध स्तरावर प्रयत्न करण्यात आले. मात्र, यानंरही मतदारांनी मतदानाला तितकासा प्रतिसाद दिला नाही. मात्र, ७९ वर्षाच्या शेख अब्दूल वहाब या वृद्धाने तसेच २१ वर्षापूर्वी लोकल मधून पडल्याने अपंगत्व आलेल्या इस्तियाक बगरजवाला या मुंब्य्रातील बाँम्बे कॉलनीत राहणाऱ्या ३१ वर्षीय तरु णाने मतदानाचा हक्क आवर्जून बजावला. काही ठिकाणी उत्साह काही ठिकाणी अनुत्साहमुंब्य्रातील काही मतदान केंद्रावर सकाळपासून मतदादानांसाठी मतदारांचा उत्साह दिसून आला. त्यामुळे काही ठिकाणी पहिल्या दोन तासांमध्ये मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. तर काही ठिकाणी मतदारांमध्ये मात्र अनुउत्साह होता. यामुळे तेथे तुरळक गर्दी होती.व्होटर स्लिप पोहोचल्या उशिराअनेक मतदान केंद्रावर मतदान सुरु झाल्यानंतर अडीच तासानी सकाळी दहा वाजता व्होटर स्लिप पोहचल्या. तर काही ठिकाणी त्या पोहचल्याच नव्हत्या. यामुळे मतदारांचे प्रतिनिधी उमेदवारांच्या स्लिपवर व्होटर स्लिप बनवून देत होते.नेत्यांचे होर्डिंग्ज जैसे थेमहापालिकेच्या निवडणुकीसाठीचा प्रचार रविवारी संध्याकाळी पाच वाजता संपला. मात्र, त्यानंतरही बहुतांशी सर्वच ठिकाणचे राजकिय नेत्यांचे फोटो, होर्डिंग्ज आणि पक्षाचे झेंडे काढण्यात आले होते. अभिनव शाळेतील मतदान केंद्राजवळ आमदार जितेंद्र आव्हाड यांचा फोटो असलेले होर्डिंग्ज मात्र मतदान संपले तरी तेथून काढण्यात आले नव्हते.
वृद्ध आणि अपंगांनी बजावला मतदानाचा हक्क
By admin | Published: February 22, 2017 6:16 AM