शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

सेंट मेरी शाळा व्यवस्थापनाविरोधातील आंदोलन सुरूच, तोडगा काढण्यासाठी ‘केडीएमसी’मध्ये धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 12:41 AM

कल्याण शहराच्या पूर्वेतील सेंट मेरी शाळेतील फीवाढ आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त महागडी पुस्तके घेण्याच्या सक्तीविरोधात पालकांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात आंदोलन सुरू केले आहे.

कल्याण : शहराच्या पूर्वेतील सेंट मेरी शाळेतील फीवाढ आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त महागडी पुस्तके घेण्याच्या सक्तीविरोधात पालकांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी शाळा बंद राहिल्यामुळे तोडगा काढण्यासाठी पालकांनी शुक्रवारी कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयात धाव घेतली.पालकांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात तीन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. पहिल्या दिवशी संतप्त पालकांनी शाळेच्या गेटला टाळे ठोकल्याचे आंदोलन केले. गुरुवारी काही पालकांसह स्थानिक शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी मुंडण आंदोलन करून व्यवस्थापनाचा निषेध केला. तसेच बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.शिक्षण मंडळाने अधिकृत अभ्यासक्रमाव्यतिरिक्त दुसरा कोणताही अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना सक्तीचा करून लादला जाऊ नये, असे आदेश शाळेला दिले होते. या आदेशानंतरही शाळा व्यवस्थापन त्यांच्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे पालकांनी आधी निवेदन, त्यानंतर घेराव, साखळी उपोषण, बेमुदत उपोषण, टाळे ठोकणे आणि मुंडण आंदोलन केले आहे. यानंतरही काहीच तोडगा निघालेला नाही. काही पालकांना फीवाढ आणि पुस्तकांचा निर्णय मान्य नाही. काही पालकांची याविषयी काहीएक कुरबुर नाही. त्यामुळे या आंदोलनाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे, असे विरोध नसणाºया पालकांचे म्हणणे आहे. शाळा व्यवस्थापन, पालिका शिक्षणाधिकाऱ्यांनी चर्चा करून तोडगा काढावा, यासाठी काही पालकांनी शुक्रवारी मुख्यालयात धाव घेतली आहे.नुकसान विद्यार्थ्यांचेच!पालक विनोद तिवारी म्हणाले की, शाळा व्यवस्थापनाने पुस्तकाची सक्ती न करण्याचे मान्य केले आहे. काही पालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेत आंदोलन सुरू ठेवले आहे. आंदोलनामुळे शाळा तीन दिवस बंद आहेत. यावर तोडगा न निघाल्यास शेवटी विद्यार्थीच भरडले जाऊ न त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रdombivaliडोंबिवली