ठाणे : ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे वाल्वमेन कर्मचाºयांना आॅगस्ट, सप्टेंबर २०२३ या दोन महिन्याचे वेतन अद्याप ही अदा केलेले नाही. त्यामुळे या कामगारांनी बुधवारी काम बंद न करता काळ्या फिती लावून आंदोलन सुरु केले. कळवा प्रभाग समितीच्या आवारात त्यांना निदर्शने केली.आॅक्टोबर महिना संपत आला आहे. घरात रेशन नाही, मुलांच्या परीक्षा सुरू आहे. उधारी वाले कामगारांना सतावत असल्याने कामगारांवर प्रचंड ताण असल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.
महापालिका आयुक्त यांच्या निदर्शनास कामगारांच्या समस्या आणून दिल्या असतांनाही त्यावर अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे बुधवारी कळवा प्रभाग समितीचे उप आयुक्त मनिष जोशी आणि सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना भेटून या कामगारांनी आपली गहार्णी मांडली. दरम्यान या पगारासाठी रोज काळ्या फिती लावून कळवा प्रभाग समितीसमोर आंदोलन केले जाईल असेहीही यावेळी युनियनने स्पष्ट केले.
कामगारांना त्वरित वेतन अदा करावे. दिपावली च्या आगोदर बोनस मिळवून देण्याचीही मागणी या वेळी करण्यात आली. उपायुक्त मनिष जोशी यांनी सांगितले की, पाणी पुरवठा विभागाची जबाबदारी आपल्याकडे नाही. पाणी पुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांच्या कडे आहे. परंतु कामगारांच्या मागण्या वरीष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.नागरिकांना त्रास न देता संबंधित कामगारांनी आंदोलन करून ही प्रश्न सुटले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्रमिक जनता संघ युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी दिला आहे. यावेळी सुमारे ७० - ७५ कामगार सहभागी झाले होते.