ठाणे : कोरोनाच्या या संकट कालावधीत आरोग्य सेवेत मानधनावर राज्यभर कार्यरत असलेल्या स्वयंसेविका व गटप्रवर्तक आदी कर्मचारी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी व जानेवारीपासून रखडलेले मानधन मिळवण्यासाठी सोमवारपासून काळ्या फिती लावून काम करीत आहेत. महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे तीन दिवसीय आंदोलन बुधवारी सायंकाळपर्यंत छेडण्यातयेत आहे.राज्यभर सुरू असलेले या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कृती समितीचे अध्यक्ष अॅड. एम.ए. पाटील, सह निमंत्रक राजेश सिंह आणि राज्य आशा-गटप्रवर्तक संघाचे भगवान दवणे आदी पदाधिकारी करीत आहेत.प्रमुख मागण्यांमध्ये आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारीचा दर्जा द्या, शासकीय आदेशप्रमाणे आशांना दोन हजार रुपये सप्टेंबरपासून त्वरित देण्यात यावे. गटप्रवर्तकांना अतिरिक्त निश्चित दहा हजारांचे मानधन मिळावे. शहरी आशा स्वयंसेविकांना प्रोत्साहनपर राशी मार्च महिन्यापासून देण्यात यावी, या कर्मचाऱ्यांना ‘कोविड-१९’ पासून संरक्षण मिळवण्यासाठी सर्व साहित्य देण्यात यावे, कोरोनाच्या कालावधीत या कर्मचाºयांचा कोणतेही कारणाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ५० लाख रुपयांचा विमा राशी देण्यात यावी आदी मागण्या या तीन आंदोलनाद्वारे या कर्मचाºयांकडून करण्यात आल्या आहेत.वाडा तालुक्यातील बिलघर या आरोग्य उपकेंद्रात काळी फीत व मास्क लावून बालकाचे वजन घेत कर्तव्य बजावणारी आशा स्वयंसेविका.
आशा स्वयंसेविकांचे काळ्या फिती लावून आंदोलन सुरू, जानेवारीपासून मानधन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 1:54 AM