कल्याण: ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात डिसेंबर महिन्यात नागपूरहून निघालेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेलची राज्यस्तरीय जनजागृती रॅली ही बुधवारी कल्याणमधून मार्गस्थ झाली. यावेळी ओबीसी समाजाच्या मागण्यांसदर्भात येत्या १४ एप्रिलपर्यंत योग्य तो तोडगा न निघाल्यास शेतकरी बांधवांप्रमाणे ओबीसी समाजही आंदोलन छेडेल असा इशारा ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी दिला.१९ डिसेंबरला या जनजागृती अभियान रॅलीला प्रारंभ झाला असून १४ एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी याचा समारोप होणार आहे. बुधवारी कल्याणमार्गे ही रॅली पुढे मार्गस्थ झाली. यामध्ये कल्याणमध्ये पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, राजेश शिंदे, राजेंद्र नांदोस्कर, प्रसन्न अचलकर, एकनाथ म्हात्रे, निरंजन भोसले आदि पदाधिका-यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. या रॅलीचे नेतृत्व ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष बाळबुधे करीत आहेत. मागासवर्ग आयोगावर ओबीसी समाजाचा अध्यक्ष असावा, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्हयात वसतीगृह करावे, ओबीसींची जातनिहाय जनगणना जाहीर करून त्यांना निती आयोगाकडून निधीची वेगळी तरतूद करावी, ओबीस आर्थिक विकास महामंडळाला ५ हजार कोटी रुपये भांडवल दयावे, उद्योग व्यवसायासाठी १० लाखांपर्यंत कर्ज मर्यादा वाढवावी, क्रिमिलेअरची अट रद्द करावी, स्वामीनाथन समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करा, मंडल कमीशनची १०० टकके अंमलबजावणी करा, शेतक-यांच्या मुलीच्या लग्नासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करा, शेतक-यांच्या तरूण मुलांना उद्योगासाठी शून्य व्याज दरावर कर्ज उपलब्ध करून दया, ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, महापालिकांमध्ये ओबीसी आरक्षण आहे पण पुढे विधानसभा लोकसभेत ओबीसींना २७ टकके आरक्षण मिळाले पाहिजे, तीन वर्षापासून प्रलंबित शिष्यवृत्ती व फ्रिशीप ताबडतोब अदा करण्यात यावी, स्पर्धा परिक्षेत महिलांना क्रिमीलीअरची जाचक अट रद्द करावी आणि देशामध्ये १६०० ओबीसी विद्यार्थी आयएएस झाले परंतू नानक्रिमीलिअरच्या अटीमुळे या प्रक्रियेतून त्यांना बाद ठरवले गेले त्यांना पुन्हा संधी दयावी आदि प्रमुख मागण्या ओबीसी सेलच्या असल्याकडे बाळबुधे यांनी लक्ष वेधले. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास शिळफाटा मार्गे कल्याण ग्रामीण भागात निघालेली ही अभियान रॅली पुढे मानपाडा, गोळवली, कल्याण पुर्वेकडील सूचक नाका, चककी नाका, तिसगांवचौक, काटेमानिवली, विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक, वालधुनी उड्डाणपुला मार्गे कल्याण पश्चिमेकडील सुभाष चौक, पौर्णिमा चौक, बिर्ला महाविद्यालय, खडकपाडा चौक, आधारवाडी चौक, लालचौकी, पारनाका, टिळकचौक, महापालिका मुख्यालय, शिवाजीचौक, बाजारपेठ मार्गे नेहरू चौक यानंतर महात्मा फुले चौक मार्गे उल्हासनगरकडे या रॅलीचे प्रस्थान झाले.
...तर शेतक-यांप्रमाणे आंदोलन छेडले जाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 4:49 PM
कल्याण: ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात डिसेंबर महिन्यात नागपूरहून निघालेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेलची राज्यस्तरीय जनजागृती रॅली ही बुधवारी कल्याणमधून मार्गस्थ झाली. यावेळी ओबीसी समाजाच्या मागण्यांसदर्भात येत्या १४ एप्रिलपर्यंत योग्य तो तोडगा न निघाल्यास शेतकरी बांधवांप्रमाणे ओबीसी समाजही आंदोलन छेडेल असा इशारा ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी दिला.
ठळक मुद्देओबीसी सेलचा सरकारला इशारा