शहरं
Join us  
Trending Stories
1
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
2
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
3
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
4
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
5
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
6
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
7
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
8
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
10
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
11
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
12
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
13
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
14
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
15
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
16
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
17
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
18
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
19
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
20
IND vs PAK : युवीची कार्बन कॉपीच! Nikhil Kumar ची बॅट तळपली; तो आउट झाला अन् मॅच फिरली

आगरी-कोळीबांधवांचा लाँग मार्च

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 5:08 AM

जिल्हाधिकारी कार्यालयावर एकदिवसीय धरणे आंदोलन : शेतजमिनी न देण्याचा इशारा

ठाणे : विविध कारणांसाठी शासनाने घेतलेल्या भूमिपुत्रांच्या जमिनी परत करा, कोस्टल रोड रद्द करा, गावठाण कोळीवाड्यांचे सीमांकन निश्चित करा, अशा विविध घोषणा करून बुधवारी आगरी-कोळीबांधव जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धडकले होते. यावेळी राबोडी ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असा लॉँग मार्च काढून एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

२० डिसेंबरच्या महासभेत महापालिका प्रशासनाने पाच भागांमध्ये क्लस्टर राबवण्याचा प्रस्ताव पटलावर ठेवला आहे. त्यात गावठाण आणि कोळीवाडे वगळल्याचाही उल्लेख केला आहे. त्यामुळेच त्याविरोधात गावठाण आणि कोळीवाड्यांनी एकत्र येऊन बुधवारी आवाज उठवला. बाळकुम, ढोकाळी, कोलशेत, माजिवडे, राबोडी, कळवा आणि घोडबंदर भागातील शेतजमिनी औद्योगिक प्रयोजनाकरिता घेतल्या. त्यासाठी काही शेतकऱ्यांना अत्यल्प, तर काहींना मोबदलाच दिलेला नाही. आता या जमिनींचे प्रयोजन बदलून निवासी बांधकामे असे केले जात आहे. मात्र, या प्रक्रि येमुळे मूळ मालक असलेल्यांना साधी बाजू मांडण्याची संधीही दिली नसल्याचे या शेतकºयांचे म्हणणे आहे. क्लस्टर राबवत असताना गावठाण आणि कोळीवाड्यांचे सीमांकन निश्चित केलेले नाही. असे असतानाही तिचा प्रस्ताव महासभेत आलाच कसा, असा सवाल यावेळी शेतकºयांनी केला.या आंदोलनाच्या निमित्ताने घोडबंदर भागातील कोस्टल रोडचा मुद्दाही यानिमित्ताने पुन्हा एकदा रडारवर आला. तो भूमिपुत्रांच्या दृष्टीने चुकीचा असून त्यामुळे त्यांच्या जमिनी जाणार असल्याचा दावा या शेतकºयांनी केला. यापूर्वी विविध विकासकामांसाठी घेतलेल्या जमिनींबाबत अनेकांना अजून योग्य तो मोबदला मिळालेला नाही. असे असताना पुन्हा नवनवीन प्रस्ताव प्रशासनाने पुढे आणले आहेत. त्यामुळे प्रस्तावित कोस्टल रोडला भूमिपुत्रांचा विरोध असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवाय, मेट्रो कास्टिंग यार्ड प्रकल्पास नागरिकांचा विरोध असून त्यासाठी शेतकरी जमीन देण्यास तयार नाहीत. खाडीकिनारी भराव टाकून कांदळवन नष्ट केले जात असून त्याकडेही दुर्लक्ष झाले आहे. या सर्व मागण्यांकडे राज्य शासन आणि महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी राबोडी पोलीस चौकी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा लाँग मार्च काढला होता.प्रशासनावर दबाव टाकाराष्ट्रवादीने या आगरी-कोळीबांधवांची भेट घेऊन त्यांच्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला. महापालिकेत सत्ता शिवसेनेची असल्याने आगरी-कोळी समाजातील शिवसेनेच्या प्रतिनिधींनी प्रशासनावर दबाव टाकावा, असे आवाहन यावेळी राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. गावठाणे आणि कोळीवाड्यांचे आधी सीमांकन निश्चित करावे. बुलेट ट्रेनसाठी जाणाºया जमिनींविरोधातही आम्ही शेतकºयांसोबत असल्याचे आश्वासन यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले.

टॅग्स :Morchaमोर्चाthaneठाणे