सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : हवामानाच्या लहरीपणाला, संकटाला ताेंड देउन फळे, भाजीपाला, कांदा आदी शेती मालक पिकवणाऱ्या शेतकऱ्याला मात्र विविध संकटाला ताेंड द्यावे लागत आहे. संकटावर मात करून पिकवलेला शेतीतील भाजीपाला जादा दिवस ताजा ठेवता येत नाही. ताे सडून नष्ठ नष्ठ हाेताे. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक संकटाला समाेरे जावे लागते. मात्र आता शेतकऱ्याना या संकटाची काळजी करण्याचे कारण नाही. यापुढे त्यांचा माल िकत्येक दिवस त्यांना ताजा ठेवता येणार आहे. त्यासाठी ठाणे येथील रहिवाशी, उच्चशिक्षित साईश्वर सुरेश कोंडे या तरूणासह आणि डॉ. अमृता सिंग यांनी कृषी तंत्र शाेधून काढले आहे.
शेतकऱ्यांकडे पुरेशा कोल्ड स्टोरेज सुविधा आणि रेफ्रिजरेटेड वाहतूक नसल्यामुळे देशभरात दरवर्षी १३,३०० कोटी रुपयांचे ताजे कृषी उत्पादन वाया जात आहे. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कृषी मालाचाही माेठ्याप्रमाणात समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. पावसाचा लहरीपणा, त्यानंतरही हाती आलेला शेतीमाल कवडीमाेल भावाने दलालांना द्यावा लागताे. काही माल जास्त दिवस ठेवल्याने सडताे. त्यामुळे शेतकरी आथिर्क विवंचनेत सापउलेला आहे. यावर मात करण्यासाठी, लहान व गरजू शेतकऱ्याला, बागायतदाराला यातून सावरण्यासाठी, त्यांचा आंबा, फणस, भाजीपाला, कारले, भेंडी, केळी, द्राक्ष, अंगुर, पेरू, डालिंब, ड्रेंगन फळ, किवी, संत्री, मोसंबी, चिकु अशा सर्व फळांवर ताजे ठेवण्याचे बहुमूल्या साेलूशन या तरूणांनी शाेधले आहे.
या सोलुन्शन मुळे बळीराजाच्या साठवणीच्या अभावामुळे शेती माल कवडीमाेल भावाने दलालांच्या हवाली करावा लागत आहे. पण आता हा शेतीतील माल खराब होन्याची चिंता दूर झाली आहे. शेतकरी स्वत: त्यांच्या शेतातील फळे ताजी ठेवून त्याला वाटेल तेव्हा ताे बाजारात आणेल, परदेशात नियार्त करले. त्यासाठी शेतकरकयांनी काेंडे व डाॅ. सिंग यांच्या सहवात येउन त्यांच्या सखाेल मार्गदर्शनासह त्यांच्याकडील धडे घेण्याची आपेक्षा काेंडे यांनी लाेकमतकडे व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या ताकदीवर ताे भव्य कार्यशाळा घेउन त्यांचे आथिक पाठबळ वाढवण्याचे तंत्र अवगत करणार आहे. बीएससी केमिस्ट्रीत उच्च शिक्षण घेतलेल्या काेंड यांच्यासह डॉ. अमृता सिंग यांनी सततच्या अभ्यासातून त्यांचा हा प्रकल्प यशस्वी केला आहे. डाेंबिवली येथील वंदेमातरम कॉलेजचे प्रिंन्सीपल डॉ. राजकुमार कोल्हे व शिक्षक घनश्याम शिरसाट यांचे सखाेल मार्गदर्शनातून फळाचे सेल्फ लाईफ वाढवणारा हा प्रकल्प त्यांनी यशस्विरीत्या आमलात आणला आहे.
या प्रकल्पासाठी निमार्ण केलेले सोल्युशन फळांची सेल्फ लाईफ म्हणजे फळावरील साल म्हणजे आवरणाची जीवन मर्यादा वाढवत आहे. कमीत कमी १८-२० दिवसापर्यंत सामान्य खोलीच्या तापमानात फळलाला ठिकुन ठेवता येत आहे. ते सुध्दा फळांमधील पौष्टिक घटक कमी न होऊ देता.हे एका वैज्ञानिकांच्या १० महिन्याच्या अथक मेहतीने व प्रत्यत्नाचे फळ आहे. यामध्ये फळे सोल्युशन मधून बुडवून काढून किंवा स्प्रे करुन फळांवर लावता येते. त्यावर नॅनो आवरण ची निर्मिती करतात . त्यामुळे फळाची जिवन मर्यादा वाढते. संशोधन करुन तयार केलेले सोल्युशन हे मानवी शरीरास व निसर्गास हानीकारक नाही आहेत.