सुरेश लोखंडे
ठाणो : जिल्ह्यातील कृषी उत्पादनावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत करून नाविण्यपूर्णवर भर देण्याची गरज आहे. कृषी यांत्रिकीवर भर देऊन जास्तीत जास्त उत्पादन वाढीवर भर देत छोटेछोटे कृषी प्रक्रिया उद्योग उभारणी व मालाची थेट मार्केटींग सुपर करण्याची गरज आहे, असे ठाणो जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांनी जिल्ह्यातील कृषी पहाणी दौ:या प्रसंगी शहापूर येथे व्यक्त करुन अधिकार्यांना शेतकर्यांच्या प्रगतीसाठी धडे दिले.
कृषी विभागाने जिल्ह्यात सध्या कृषि संजिवनी मोहीम हाती घेतली आहे. 1 जुलैपर्यंत राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेस अनुसरून जिल्हाधिका:यांनी गुरूवारी शहापूर तालुक्याचा कृषी दौरा केला. त्याप्रसंगी साखरोली येथील माळरानावरील फळबाग लावडीच्या कार्यक्रमासह आटगांव येथील कार्यक्रमात उपस्थित शेतक:यांसह अधिका:यांना त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. कृषी यांत्रिकीसह कृषी प्रक्रियेसाठी उद्योग उभारणी आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट सुपर मार्केटची गरज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तर जिल्हा कृषी अधीक्षक अंकूश माने यांनी कृषी संजिवनी मोहिमेचे मी महत्व लोकमतला सांगितले. यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतक:यांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यात ही कृषि संजिवनी मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमे दरम्यान राज्यातील कृषि विभागाचे अधिकारी,कर्मचारी,जिल्हा परिषद, कृषि विद्यापीठे, कृषि विज्ञान केंद्रांचे शास्त्रज्ञ, कृषिमित्र आदी जिल्ह्यातील शेतक:यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत आहे.यास अनुसरून ठाणो जिल्हाधिका:यांनी गुरूवारी कृषी दौरा करून शेतक:यांसह अधिका:यांना आधुनिक शेतीचे महत्व पटवून दिले. कृषि तंत्रज्ञानामधील छोटीशी सुधारणा देखील पीक उत्पादन वाढीवर मोठा परिणाम करु शकते, त्यासाठी त्यास अनुसरून जिल्ह्यात ही कृषि संजीवनी मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेच्या कालावधीत प्रत्येक कार्यालयीन दिवशी महत्वाच्या उपक्रमांवर विशेष भर देऊन कृषि संजिवनी मोहीम साजरी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील या कृषि संजिवनी मोहीमे दरम्यान दररोज कृषि विभागाचे यूट्यूब चॅनेल माध्यमातून तपशीलाप्रमाण वेबनार आयोजित करण्यात आले आहे. आतार्पयत एसआरटी लागवड तंत्रज्ञान, बीज प्रक्रिया, खताचा संतुलीत वापर, आणि आज सुधारीत भात लागवड तंत्रज्ञान वेबनार जिल्हाधिका:यांच्या उपस्थितीत पार पडला. शुक्रवारी विकेल ते पिकेल या विषयावर असून यानंतर फळबाग लागवड - तंत्रज्ञान प्रसार तालुक्यातील दोन पिकात उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतक:यांचा सहभाग, जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना आणि कृषि दिनाच्या कार्यक्रमानंतर ही मोहीम संपणार असल्याचे माने यांनी सांगितले.