उल्हासनगर :
महापालिकेतील विकास कामे भेटावे, यासाठी लहान ठेकेदारानी एकत्र येत मंगळवारी दुपारी आमदार कुमार आयलानी यांच्याकडे साकडे घातले. महापालिकेचे लहान कामे एकत्र करून मोठ्या ठेकेदाराला दिले जात असल्याने, लहान ठेकेदारावर उपासमारीची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.
उल्हासनगर महापालिकेत लहान लहान कामे एकत्र करून मोठया ठेकेदाराला कामे दिले जात असल्याचा आरोप लहान ठेकेदारांनी केला. याप्रकारने लहान ठेकेदारावर उपासमारीची वेळ आल्याचे ते म्हणाले. यापूर्वी महापालिकेने जलवाहिनी दुरुस्ती करण्याचा ठेका तब्बल ३ वर्षासाठी एकाच ठेकेदाराला दिल्याचा प्रकार घडला होता. या निषेधार्थ लहान ठेकेदारानी एकत्र येत महापालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. परिणामी महापालिकेला जलवाहिन्या दुरुस्ती करण्याचा ठेका रद्द करावा लागला. याच प्रमाणे लहान लहान कामे एकत्र करून मोठ्या ठेकेदाराला दिले जात असल्याने, मजूर संस्था, लहान ठेकेदार, बेरोजगार अभियंता आदी ठेकेदारानी एकत्र येत मंगळवारी दुपारी १ वाजता आमदार कुमार आयलानी यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन कामासाठी साकडे घातले.
आमदार कुमार आयलानी, भाजप शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी लहान ठेकेदारांचे म्हणणे ऐकून याबाबत पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले. तसेच आमदार विकास निधीतील कामे देतांना लहान ठेकेदाराना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. तसेच महापालिका आयुक्त अजीज शेख यांची भेट घेऊन यापूर्वी जशी ठेकेदारांना कामे दिली जात होती. त्याप्रमाणे कामे देण्याचे आयलानी सुचविणार आहेत. ठेकेदारानी महापालिकेत लहान कामे एकत्र करून मोठ्या ठेकेदाराला दिल्यास, आंदोलनाचा इशारा दिला. तसेच असेच कामकाज महापालिकेचे सुरू राहिल्यास, लहान ठेकेदारावर उपासमारीची वेळ येणार असल्याचे म्हणाले. महापालिका केलेल्या कामाचे बिलही महिनोंमहिने काढले जात नसल्याने, ठेकेदाराना आर्थिक फटका बसत असून महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचे ठेकेदार म्हणाले.
मोजक्याच ठेकेदाराचा बोलबाला महापालिकेत राजकीय पक्षा सोबत संबंध ठेवणाऱ्या मोजक्याच ठेकेदारांचा बोलबाला आहे. त्याच ठेकेदारांना मोठ्या ठेक्याची कामे वर्षानुवर्षे दिली जात असून त्यांच्यावर इंग्रजांची ईस्ट कंपनीचा आरोप सर्वस्तरातून होतो.