शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अजित पवार म्हणाले सुत्रधार कोण? घटनेनंतर मुख्यमंत्री संबंधित महिलेसोबत फोटोत दिसतात

By अजित मांडके | Published: November 14, 2022 8:38 PM

मुंब्रा पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे

ठाणे  : कायदे कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून तयार केलेले आहेत. मात्र त्याच कायद्यांचा अशा चुकीच्या पध्दतीने वापर होत असेल तर ते नक्कीच चुकीचं आहे. त्यातही न केलेल्या गुन्ह्यात अडकवले जात असेल तर तो माणूस खचणारच. त्यामुळेच व्यतीथ होऊन आव्हाड यांनी राजीनामा दिलेला आहे. मात्र, आव्हाड हे शरद पवार यांना दैवत मानतात. त्यांचा शब्द ते महत्वपूर्ण मानतात. त्यामुळे त्यांचा जो निर्णय असेल तो आव्हाड यांना पाळावाच लागेल असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठाण्यात केले. तसेच, यामागे निश्चितच एक षडयंत्र असून त्यात गोवण्याचा प्रकार होत असून यामागे नेमके कोण आहे, ही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री त्या महिलेसोबत दिसत असल्याचे फोटो दिसत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकारची योग्य चौकशी करुन जे जे या प्रकरणात दोषी असतील व त्याचा मुख्य सुत्रधार कोण याचा शोध घेऊन त्यांच्यावर त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली.                 मुंब्रा पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांना समजविण्यासाठी पवार हे ठाण्यात आले होते. ७२ तासात राज्याच्या माजी कॅबीनेट मंत्र्यांवर दोन दोन गुन्हे दाखल होतात, हे घाणरडे राजकारण सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. आज सरकार बदलेले आहे, म्हणून विरोधकांचा आवाज अशा पध्दतीने दाबण्याचा प्रयत्न जर सरकार करीत असेल तर ही लाजीरवाणी बाब आहे. सरकार येत असते, जात असते, कोणी कायम तेथे बसायला आलेला नसतो. जोर्पयत 145 आमदारांचा पाठींबा असतो, तो र्पयत ती व्यक्ती त्या ठिकाणी बसू शकते, हे अनेक वेळा सिध्द झालेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवे होते, किंबहुना पोलिसांनी हे सांगणो अपेक्षित होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. परंतु अशा पध्दतीने राजकारण होणार असेल तर लोकशाही, संविधान, कायदा, नियम, घटना या सगळयांनाच तिलांजली देण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जातीने लक्ष घातले पाहिजे. परंतु कायदयाचा आधार घेऊन निष्पाप व्यक्तीवर अन्याय होत असेल तर ते योग्य नाही. पोलीस दबावाखाली वागत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. आमच्याकडेही साडेसतरा वर्षे गृहखाते होते, मात्र आम्ही अशा पध्दतीने कायद्यांची पायमल्ली केली गेली नाही. त्यामुळे राजीनामा देता आव्हाड यांनी एकजूटपणो या विरोधात लढा देऊ असेही त्यांनी सांगितले. अधिवेषणात याविरोधात आवाज उचलला जाईल आणि जाब विचारला जाईल असेही त्यांनी सांगितले.

मध्यावती निवडणुकांची शक्यता नाही - पवार

सध्यातरी कुठेही मध्यवती निवडणुका लागणार नाहीत. असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले. सध्याच्या सरकारकडे १४५ आमदारांचा पाठींबा आहे, आणि तो कुठे कमी होईल असे चित्र दिसत नाही. महाविकास आघाडीचे सरकार असतांनाही त्यांच्याकडेही १४५ आमदारांचे संख्याबळ होते. मात्र, एक गट बाहेर पडल्याने सरकार कोसळले. परंतु संजय राऊत यांनी हे विधान कसे केले, याची माहिती मी त्यांच्याशी चर्चा करुनच देईन. मात्र, तुर्तास मध्यावती निवडणुका लागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेCrime Newsगुन्हेगारीthaneठाणे