उल्हासनगरात राष्ट्रवादीच्या गंगोत्री गटाचा ढोलताशे वाजवून फटाक्याची अतिषबाजी, अजित पवार जिंदाबादच्या घोषणा

By सदानंद नाईक | Published: July 2, 2023 07:17 PM2023-07-02T19:17:24+5:302023-07-02T19:17:32+5:30

फटाक्याच्या आतिषबाजी वेळी गंगोत्रीसह पक्षाचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Ajit Pawar's Zindabad slogans were fired by NCP's Gangotri faction in Ulhasnagar | उल्हासनगरात राष्ट्रवादीच्या गंगोत्री गटाचा ढोलताशे वाजवून फटाक्याची अतिषबाजी, अजित पवार जिंदाबादच्या घोषणा

उल्हासनगरात राष्ट्रवादीच्या गंगोत्री गटाचा ढोलताशे वाजवून फटाक्याची अतिषबाजी, अजित पवार जिंदाबादच्या घोषणा

googlenewsNext

सदानंद नाईक 
उल्हासनगर :
शहर राष्ट्रवादीच्या गंगोत्री गटाने अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच मध्यवर्ती कार्यालया समोर ढोलताशे वाजवून व फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला. दुसरीकडे कलानी महल मध्ये शुकशुकाट असून माजी आमदार पप्पु कलानी, शहरजिल्हाध्ययक्ष पंचम कलानी व युवानेते ओमी कलानी यांच्या सोबत संपर्क केला असता, मोबाईल बंद होता. 

उल्हासनगरात राष्ट्रवादी पक्षात कलानी व गंगोत्री गट आहेत. त्यापैकी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष पदी पंचम कलानी असून कलानी कुटुंब हे कट्टर शहर पवार समर्थक आहेत. तर गंगोत्री गट अजित पवार यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. रविवारी दुपारी अजित पवार यांच्यासह अन्य राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी मंत्री पदाची शपथविधी झाल्यानंतर, पक्षाचे भारत गंगोत्री यांच्या गटाने कॅम्प नं-५ येथील मध्यवर्ती कार्यालया समोर ढोलताशे वाजवून फटाक्यांची आतिषबाजी केली. तसेच एकमेकाला पेढे भरून अजित पवार यांच्या जिंदाबादच्या घोषणा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत असल्याची प्रतिक्रिया भारत गंगोत्री, माजी शहरजिल्हाध्यक्ष सोनिया कौर धामी, माजी नगरसेविका सुनीता बगाडे, विशाल माखिजा, विकास खरात, माधव बगाडे आदींनी दिली. फटाक्याच्या आतिषबाजी वेळी गंगोत्रीसह पक्षाचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रवादी पक्षाच्या शहरजिल्हाध्यक्षा पंचम कलानी, माजी आमदार पप्पु कलानी, युवानेते ओमी कलानी, पक्ष प्रवक्ते कमलेश निकम आदीचे मोबाईल बंद असून कलानी महल मध्ये शुकशुकाट आहे. कलानी कुटुंब राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक असून ते अजित पवार यांच्या सोबत जाणार नसल्याचे बोलले जात आहे. मात्र माजी आमदार यांना जेल बाहेर राहण्यासाठी अजित पवार यांच्या सोबत जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांच्या भाजप आघाडीत जाण्याने शहर राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे.

Web Title: Ajit Pawar's Zindabad slogans were fired by NCP's Gangotri faction in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.