ठाणे : चीनमधील कास्टिक्स कॉन्टेस्ट या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ठाण्याच्या ए. के. जोशी स्कूलच्या दोन प्रकल्पांना कांस्यपदक मिळाले आहे. सिक्युरिटी सिस्टीम फॉर ज्वेलरी शॉप आणि अॅटोमॅटिक कार पार्किंग हे दोन्ही प्रकल्प सर्वसामान्य माणसांच्या जीवनाशी निगडित असल्याने ते पाहण्यासाठी विज्ञानप्रेमी आणि विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.दरवर्षीप्रमाणे चीन येथे चायना अॅडोलन्स्ट सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी इन्व्हेशन कॉन्टेस्ट पार पडली. यंदा यात जगभरातील सुमारे २१ देशांतील मिळून ४० प्रकल्प सादर करण्यात आले. या स्पर्धेत ठाण्यातील आनंदीबाई जोशी अर्थात ए.के. जोशी स्कूलचे विद्यार्थी दोन प्रकल्पांसह दहाव्या वर्षी सहभागी होते. ते दोन्ही कांस्यपदकाचे मानकरी ठरले. जर्मनीच्या प्रकल्पाला सुवर्ण, तर स्वीडनच्या प्रकल्पाला रौप्यपदक मिळाले. त्यांचे प्रकल्प हे बायोलॉजी, मॅथेमॅटिक्सशी संबंधित होते.जोशी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे ‘लो कॉस्ट सिक्युरिटी सिस्टीम फॉर ज्वेलरी शॉप’ आणि ‘अॅटोमॅटिक कार पार्किं ग’ हे दोन्ही प्रकल्प थेट प्रात्यक्षिकाद्वारे आणि मनोरंजनात्मक पद्धतीने सादर केले असल्याने उपस्थित प्रत्येकाने ते आवर्जून पाहिले. आठवीतील मिहिर गोरे आणि रुचिर चित्रे या विद्यार्थ्यांनी ‘लो कॉस्ट सिक्युरिटी सिस्टीम फॉर ज्वेलरी शॉप’ हा ज्वेलरी शॉपमधील चोरीवर नजर ठेवणारा आगळावेगळा प्रकल्प तयार केला होता.ज्वेलरी शॉपमध्ये जर रात्रीच्या वेळी चोरी झाली, तर तिथे असणाºया मोबाइलमधील इन्फ्रा रेड ज्वेलरी शॉपच्या मालकाच्या मोबाइलशी कनेक्ट होईल आणि त्याच्या मोबाइलमध्ये अलार्म वाजेल. एका चीपच्या माध्यमातून ज्वेलरी शॉपमध्ये होणाºया चोरीवर देखरेख ठेवता येणे शक्य आहे. पार्किं गची वाढती समस्या लक्षात घेऊन दहावीतील यश कोकाणे आणि धुव्र देवरे यांनी ‘अॅटोमॅटिक कार पार्किं ग’ या विषयावरील प्रकल्प तयार केला होता. या प्रकल्पात गाडीला चारही बाजूने सेन्सर लावलेले असतात. कोणत्याही ठिकाणी गेल्यावर गाडी पार्किं गसाठी स्वत:च जागा शोधते. जागेनुसार मागेपुढे होते. या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा भांगले, पूर्णिमा साठे, मीना निफाडकर, पल्लवी पटवर्धन यांचे मार्गदर्शन लाभले, तर विशेष मार्गदर्शन करणारे डॉ. विजय बेडेकर आणि डॉ. सुधाकर आगरकर हे त्यांच्यासोबत चीन येथे गेले होते.
ए.के. जोशीच्या प्रकल्पांची चीनमध्ये बाजी , कांस्यपदकाने सन्मानित : ज्वेलरी शॉपमधील चोेरी, अॅटोमॅटिक पार्किंगचे सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 2:32 AM