सचिन सागरे कल्याण : चिपळूण येथे रविवारी झालेल्या ७० व्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव निवड चाचणी स्पर्धेत कुमार गटात कल्याणचा अक्षय कारभारी ‘महाराष्ट्रकुमार’चा मानकरी ठरला आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये बंगळुरू येथे होणाºया ‘भारत कुमार श्री’साठी त्याची निवड झाली आहे.चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील मैदानात झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे ३५० स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत एकापेक्षा एक पोज देत अक्षयने उपस्थितांची मने जिंकली. सलग दुसऱ्यांदा अक्षयने ‘महाराष्ट्रकुमार’ पदकावर आपले नाव कोरले आहे. पश्चिमेतील उंबर्डे गावातील हिºयाचापाडा येथे राहणाºया अक्षयने वडिलांना कुस्ती खेळताना पाहून इयत्ता तिसरीत असताना कुस्ती खेळायला सुरुवात केली. दहावीपर्यंत जिल्हास्तरीय कुस्ती खेळल्यानंतर आवड म्हणून २०१४ पासून व्यायामशाळेत जाण्यास सुरुवात केली. २०१७ मध्ये पहिल्यांदा शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये भाग घेणाºया अक्षयने ‘ठाणे किशोर’चा किताब पटकावला. त्यानंतर, ‘महाराष्ट्र किशोर श्री’साठी निवड झालेल्या स्पर्धेत अक्षयने सुवर्णपदक पटकावले. शरीरसौष्ठव स्पर्धेत कमी कालावधीमध्ये अक्षयने दोनदा ‘ठाणे कुमार’ पटकावण्याबरोबरच ‘ठाणे किशोर’, ‘ठाणे महापौर श्री’, ‘कल्याण श्री’, ‘मावळी मंडळ श्री’ किताब पटकावले आहेत. त्याचप्रमाणे, ‘भारत किशोर’मध्ये सुवर्णपदक पटकावत किताब उपविजेता ठरला आहे. आतापर्यंत अक्षयने नऊ किताबांसह एक उपविजेतेपद पटकावले आहे.
महाराष्ट्र अॅम्युचर बॉडी बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अनिल वझे यांच्या देखरेखीखाली किशोर ऊर्फ अण्णा शेट्टी यांच्या डोंबिवलीतील व्यायामशाळेत सध्या सहा ते सात तास व्यायामाचा सराव करत असल्याचे अक्षयने सांगितले. शरीरसौष्ठव स्पर्धा आव्हानात्मक असल्याने दरमहिन्याला डाएट बदलले जाते. मेहनत केल्यास आपल्याला हमखास यश मिळते, असेही सांगायला अक्षय विसरत नाही.‘मिस्टर एशिया’चे ध्येयमिस्टर एशिया हा किताब मिळवणे अक्षयचे स्वप्न आहे, त्यासाठी तो सध्या खूप मेहनत घेत आहे. त्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडिलांबरोबरच त्याच्या कुटुंबीयांचेही मोलाचे सहकार्य मिळत आहे.