जितेंद्र कालेकरठाणे : संपूर्ण देशभर विस्तार असलेल्या ‘अक्षयपात्र’ या सामाजिक संस्थेमार्फत ठाणे महापालिकेच्या २६ शाळांमधील पाच हजार ८६६ विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरवले जाते. नियमित आणि पुरेशा मिळणाऱ्या या माध्यान्ह भोजनाच्या निमित्तानेही महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागल्याचे अनेक पालक सांगतात.विद्यार्थ्यांना भोजन देणा-या या संस्थेला पवारनगर येथे पालिका प्रशासनाने शाळा क्रमांक १३३ ची जागा दिली. जुन्या पडक्या शाळेच्या जागेचा कायापालट करून संस्थेने काही सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या मदतीने भव्य अत्याधुनिक स्वयंपाकगृह उभारले. आॅगस्ट २०१७ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या ‘अक्षयपात्र’मुळे गरीब सामान्यवर्गातील मुलांना आधार मिळाला आहे. आता त्याची वर्षपूर्ती होत आहे.याठिकाणी मुलांना त्यांच्या ऐन जेवणाच्या वेळेत गरम, आरोग्यवर्धक, प्रोटीनयुक्त आहाराची पॅकेट्स पुरवली जातात. डाळ, भात, भाजी आणि चपाती अशा आहाराच्या पॅकेटचा यात समावेश असतो. ठाणे शहरातील भार्इंदरपाड्यापासून अगदी येऊरच्या पाटोणपाड्यापर्यंतच्या शाळेतील मुलांना हा आहार अत्याधुनिक वाहनांमधून पुरवला जातो.
ठाण्यातील पालिका शाळांच्या सहा हजार विद्यार्थ्यांच्या ‘अक्षयपात्र’ माध्यान्ह भोजनाची वर्षपूर्ती
By जितेंद्र कालेकर | Published: August 01, 2018 10:19 PM
देशभरात नावाजलेल्या ‘अक्षयपात्र’ या सामाजिक संस्थेमार्फत ठाणे महापालिकेच्या २६ शाळांमधील पाच हजार ८६६ विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरवले जाते. सकस ताज्या जेवणामुळे विद्यार्थ्यांना शाळेचा लळा लागल्याचे शिक्षक सांगतात.
ठळक मुद्दे पवारनगर येथील जागेत साकारले भव्य स्वयंपाकगृह२६ शाळांमधील विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्थासकस ताज्या जेवणामुळे विद्यार्थ्यांना शाळेचा लळा