शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडल्याने सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2019 2:33 AM

कल्याण-अहमदनगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील नद्या पुराच्या पाण्यामुळे शनिवारी दुथडी भरून वाहत होत्या. सततच्या पावसामुळे भातसा धरणाचे पाच दरवाजे २.५० मीटर इतके उघडण्यात आले. धरणातून भातसा नदीत सुमारे ९३४ क्युसेस पाणी सोडण्यात आले होते.या नदीच्या काठावरील शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल, सापगाव व नदीकाठावरील गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. या काळात वाहत्या पाण्यात प्रवेश न करण्याच्या व दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी दिल्या आहेत. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ८९० मिमी पाऊस पडला. या पावसाची सरासरी १२७.१४ मिमीनोंद घेण्यात आली.दरम्यान, ठाणे येथे दोन व उल्हासनगर येथील एकाचा पावसादरम्यान मृत्यू झाल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाने सांगितले. यामध्ये ठाणे येथील मनोरुग्णालयाच्या वसाहतीमधील संतोष जाधव (१८) हा तरुण घरात पाणी शिरले असता फ्रीज हलवत असताना विजेचा शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. तर, दिवा येथील डीजे कम्पाउंडजवळील नाल्यात सुनीत पुनीत (३०) हा तरुण नाल्यात पडून दगावला. तर, उल्हासनगर येथील गौरीपाडा येथील मनीष चव्हाण या तरुणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. तर, उल्हासनगर येथील कॅम्प नंबर १मध्ये एका बालिकेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.जिल्हाभरातील या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. मात्र, निर्णय घेण्यास विलंब झाल्यामुळे काही शाळा सुरू झाल्या होत्या. या दरम्यान शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना घरी सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शाळांवर सोपवली होती. रेल्वेसेवा पार कोलमडली आहे. सकाळच्या कालावधीत काही ठिकाणी उपनगरीय गाड्यांची सेवा काही काळ बंद करावी लागली. ठाणे स्टेशन परिसरात रेल्वेरुळांवर पाणी साचले होते. त्यानंतर, दुपारी सुमारे दीड तास उशिराने उपनगरीय गाड्यांची वाहतूक सुरू राहिली.सकाळच्या कालावधीत उल्हास नदीच्या पुराचे पाणी वाढल्यामुळे कल्याण-अहमदनगर महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. या महामार्गावरील माळशेज घाटातील अंबेवळणावर एक झाड पडले. ते त्वरित हटवण्याचे कामही महामार्ग बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्याचे उपकार्यकारी अभियंता सुनील पाटील यांनी सांगितले.कल्याण रेल्वेस्थानकातील छतगळतीमुळे प्लॅटफॉर्मवर पाणीचपाणी झाल्यामुळे प्रवाशांना उभे राहण्यात अडथळा निर्माण झाला.याशिवाय कल्याण स्टेशन परिसरातही पाणी साचले. तर, टाटा पॉवर हाउस, वरपगाव, म्हारळ, कांबा, टिटवाळा परिसरातील रुंदे आदी परिसरांत पाणी साचले.सर्वाधिक शहापूर तालुक्यातसर्वाधिक पाऊस शहापूर तालुक्यात १४० मिमी, भिवंडी तालुक्यात १३० मिमी, कल्याणला १५८, मुरबाडला १२५, अंबरनाथला ११२, उल्हासनगरला १०८ आणि ठाणे शहरात ११७ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९७.०२ टक्के पाऊस पडला.

टॅग्स :Rainपाऊस