अंबरनाथ : 13 नोव्हेंबर रोजी अंबरनाथच्या एमआयडीसी परिसरात दोन गटातील वादात जो गोळीबाराचा प्रकार घडला होता. त्या गोळीबार प्रकरणातील सर्व आरोपींच्या विरोधात मुक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर आता आरोपी उच्च न्यायालयात दात मागण्याची शक्यता आहे. बैलगाडा शर्यतीच्या वादातून कल्याण ग्रामीणचे राहुल पाटील यांच्यावर पंढरीनाथ फडके आणि त्यांच्या समर्थकांनी गोळीबार केला होता. याप्रकरणी सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात कल्याण डोंबिवलीचे माजी नगरसेवक कुणाल पाटील त्यांचे भाऊ मयूर पाटील आणि अनिल पाटील यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या तिन्ही आरोपींनी कल्याण सत्र न्यायालयातून अटके पासून संरक्षण मिळवले होते. कल्याण न्यायालयात आरोपींना संरक्षण मिळताच पोलिसांनी आता कठोर भूमिका घेत थेट सर्व आरोपींच्या विरोधात मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोपींवर मुक्कांतर्गत कारवाई झाल्याने या प्रकरणाची चर्चा आता सुरू झाली आहे. पंढरीनाथ फडके, एकनाथ फडके, हरिशचंद्र फडके, केतन देशमुख, संदेश उर्फ पप्या फडके, समीर कुटले, प्रशांत फडके, महेश म्हात्रे, संदीप जळे या अटकेत असलेल्या आरोपींच्या विरोधात मुक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच जे आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही त्यातील गुरुनाथ फडके, मंगेश फडके, राजेंद्र फडके, अक्षय फडके, रेवन फडके, मिलन पालकर, स्वतंत्र पालकर, अशोक गायकर, किरण गायकवाड, संतोष पाटील, राजेश काथार, दर्शन शेळके, अतुल भोईर, योगेश लहाने, संयोग भोईर, हितेश भोईर, सुमीत म्हात्रे, दिपक जाधव,दर्शन पाटील, शिवाजी पाटील, मयुर पाटील, कुणाल पाटील, अनिल पाटील यांच्यावर देखील गुन्हेगारी कृत्यांना आळा घालणेसाठी मुक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.