ठाणे : दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा, क्लासेसमधून पूर्वपरीक्षा होतात. तिथे त्यांना मार्गदर्शन होते. तरीही प्रत्यक्ष परीक्षेची धास्ती सगळ्यांनाच असते. शेवटपर्यंत पालक, नातेवाईक, मित्रवर्ग प्रत्येकजण सल्ले देतो. पण, कितीही अभ्यास केला, तरी काही वेळा प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका हातात आल्यावर त्या वाचून ठरावीक बाबींचे भान राखण्याचा सल्ला सरस्वती सेकंडरी स्कूलचे ज्येष्ठ शिक्षक सुरेश जंगले यांनी दिला आहे.दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास सुरूच असतो. पण, सोबतच लेखनकौशल्य आणि लहानसहान बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जी उत्तरे येतात, ती लिहावी. दोन तासांचा वेळ असेल तर त्यातील एखादा मिनिटही वाया घालवू नये. गुणवत्तेचा वापर करून आणि जास्तीतजास्त आणि सुवाच्च, नीटनेटकेपणे लिहिण्याचा प्रयत्न करावा, असे जंगले यांनी सांगितले.>प्रश्नपत्रिका पूर्ण वाचावी...प्रश्नपत्रिका हातात आल्यावर ती पूर्ण वाचावी.त्यातील कोणताही प्रश्न अभ्यासक्रमापलीकडचा वाटल्यास त्यावर इतर विद्यार्थ्यांशी चर्चा न करता उपस्थित पर्यवेक्षकांना शंका विचारावी.काही मुले त्या प्रश्नपत्रिकेवर जोड्या लावा किंवा चूक-बरोबर, रिकाम्या जागा भरा, असे प्रश्न सोडवतात; मात्र तशा प्रकारची प्रश्नपत्रिका आढळल्यास ती कॉपी समजली जाईल. त्यामुळे त्यावर रफ काम करू नये.रफ काम करायचे असल्यास उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर रफ करावे. त्यावर रफ कामासाठी...असे लिहावे.उत्तरपत्रिका हातात आल्यावर...उत्तरपत्रिका हातात आल्यावर आपला परीक्षा क्रमांक आणि संबंधित सर्व माहिती सर्वात आधीव्यवस्थित भरावी.उत्तरपत्रिकेच्या डाव्या बाजूला समास असतो, तसाच उजव्या बाजूला एक सेंटीमीटरवरच समास आखून घ्यावा.काही मुले उत्तरपत्रिका हातात आल्यावर नुसते समास आखतात आणि तेही मोठे. मात्र, उजव्या बाजूला इतक्या मोठ्या समासाची आवश्यकता नसते. त्यामुळे उत्तर लेखनासाठीची जागा ही अतिशय चिंचोळी राहते.>प्रश्नोत्तरे लिहिताना काही महत्त्वाचे...सूचना केल्यानुसार सर्व प्रश्नांची उत्तरे लिहावी. शक्यतो कोणताही प्रश्न सोडून देऊ नये.अनेकदा विद्यार्थ्यांना तीनपैकी दोन उत्तरे लिहा, असे सांगितलेले असते. तीनही उत्तरे येत असल्यास आणि सुरुवातीचा वेळ असल्यास विद्यार्थी तीनही उत्तरे लिहितात. मात्र, तसे न करता दोनच योग्य आणि पूर्ण येत असलेली उत्तरे लिहावी.पेपर सुटला असे अनेकदा विद्यार्थ्यांकडून ऐकायला मिळते. पण, सुरुवातीच्या सर्व प्रश्नांची सूचनेपेक्षा जास्त उत्तरे लिहीत राहिल्यास शेवटच्या प्रश्नांची उत्तरे लिहिताना विद्यार्थ्यांना वेळ कमी पडतो. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त प्रश्न सोडवणे शक्यतो टाळावे.आठपैकी पाच सोडवा, असे लिहिलेले असताना त्यातील कोणत्याही प्रश्नांची उत्तरे लिहा, पण लिहीत असलेल्या प्रश्नाचाच नंबर उत्तरासमोर लिहा.उत्तरपत्रिकेत फार खाडाखोड न करता चुकलेल्या शब्दांवर केवळ एक आडवी रेषा मारावी. काही विद्यार्थी त्या शब्दांवर रेषा न मारता मार्जिनमध्ये चुकीची खूण करतात. मात्र, तशी खूण ग्राह्य धरली जात नाही.काही कमी अभ्यास केलेली मुले एखादा प्रश्न येत नाही म्हणून सोडून देतात. मात्र, तसे करू नये. त्या प्रश्नातील जो भाग, जी माहिती आपल्याला येते, तो उत्तरपत्रिकेत लिहावा.>अनुष्काला मिळाले हॉलतिकीटलोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण पूर्वेतील एका इंग्रजी शाळेत शिकणारी दहावीची विद्यार्थिनी अनुष्का जाधव हिने मार्च महिन्यापर्यंतची सर्व शैक्षणिक फी भरलेली असताना केवळ अॅडव्हान्स फीसाठी तिचे हॉलतिकीट शाळेने रोखून धरले होते. दहावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू होत असताना हॉलतिकीट न मिळाल्याने अनुष्का आणि तिच्या पालकांची चिंता वाढत होती. अखेर, राष्ट्र कल्याण पार्टीच्या मदतीने पालकांनी शाळेबाहेर धरणे आंदोलन केल्यानंतर अनुष्काला हॉलतिकीट मिळाले.अनुष्काने जून ते मार्चपर्यंतचे सर्व शुल्क भरलेले असताना शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापिका आणि संचालक मंडळाकडून तिला एप्रिल व मे महिन्यांची फी आताच भरा, असा आग्रह धरण्यात आला होता. शाळेच्या नियमानुसार एप्रिल व मे महिन्याची फी भरण्यासाठी अंतिम मुदत ३१ मार्च असतानाही अनुष्काचे हॉलतिकीट शाळेने दिले नाही. अनुष्कासोबत आणखी तीन विद्यार्थ्यांनाही शाळेने आधी फी भरण्यास सांगितले. त्यांनी फी भरल्याने त्यांना हॉलतिकीट देण्यात आले. मात्र, अनुष्काचे हॉलतिकीट तिला मिळाले नव्हते.शाळेने दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना १५ दिवसांपूर्वीची हॉलतिकिटाचे वाटप केले होते. केवळ अनुष्काने अॅडव्हान्स फी न भरल्याने तिचे हॉलतिकीट देण्यात आले नव्हते. शाळा व्यवस्थापन स्वत:चेच नियम डावलून मुदतीआधी अनुष्काला फी भरण्याचा आग्रह करीत होते. तिचे वडील रोशन यांनी २२ फेबु्रवारीला शाळेकडे यासंदर्भात लेखी तक्रार केली. हॉलतिकीट न देण्याचे कारणही विचारले.रोशन जाधव यांच्या तक्रारीवर शाळेने लेखी पोहोच देण्यास नकार देऊन, एप्रिल आणि मे ची फी भरली नाही, तर हॉलतिकीट देणार नाही, असे त्यांना सांगितले. जाधव यांनी फी लवकरच भरण्याचे आश्वासन देऊनही तिला हॉलतिकीट दिले नाही. त्यानंतर अनुष्काच्या वडिलांनी शनिवारी कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. मात्र, परीक्षेच्या एक दिवस आधीही हॉलतिकीट न मिळाल्याने सोमवारी शाळेबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शाळेने अनुष्काला तिचे हॉलतिकीट दिले. यावेळी राष्ट्र कल्याण पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी, महासचिव राहुल काटकर, मनसेचे माजी नगरसेवक अनंता गायकवाड, योगेश गव्हाणे, जितेंद्र वाकचौरे, दुर्गेश मिश्रा आणि कार्यकर्ते उपस्थित होते.>नियमित शुल्क भरलेले असतानाही, केवळ अॅडव्हान्स फीसाठी ऐन परीक्षेच्या काळात एखाद्या विद्यार्थिनीची अशाप्रकारे कोंडी करण्याच्या शाळा व्यवस्थापनाच्या भूमिकेवर सर्वस्तरातून आश्चर्य व्यक्त होत आहे.
दहावीला जिल्ह्यात सव्वा लाख परीक्षार्थी, गैरप्रकार टाळण्यासाठी पाच भरारी पथकांचे नियोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 1:15 AM