शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

घोडबंदरच्या सर्व्हिस रोडचे सर्व गॅरेज आजपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 12:17 AM

मेट्रोसाठी आवश्यकतेनुसारच बॅरिकेड्स लावावेत. सेवारस्त्यांवरील पार्किंग बंद करावी. जलवाहिनी आणि मलनि:सारणवाहिनी टाकण्याचे काम एकाच वेळी करावे, असे स्पष्ट निर्देशही आयुक्तांनी दिले.

ठाणे : मेट्रोसह महापालिकेच्या विविध विभागांची मुख्य आणि सेवारस्त्यांवर सुरू असलेली कामे, अनधिकृत पार्किंग आणि गॅरेजचालकांनी रस्ते अडवल्याने घोडबंदरला होणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी कापूरबावडी ते भार्इंदरपाड्यापर्यंतच्या दोन्ही बाजंूच्या सर्व्हिस रोडवरील गॅरेज शुक्रवारपासून बंद करण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी दिले.मेट्रोसाठी आवश्यकतेनुसारच बॅरिकेड्स लावावेत. सेवारस्त्यांवरील पार्किंग बंद करावी. जलवाहिनी आणि मलनि:सारणवाहिनी टाकण्याचे काम एकाच वेळी करावे, असे स्पष्ट निर्देशही आयुक्तांनी दिले. घोडबंदरच्या कोंडीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच, आयुक्तांनी तत्काळ बैठक घेतली. या वाहतूककोंडीचा फटका आपल्यालाही सहन करावा लागत असल्याची कबुली आयुक्तांनी दिली. कोंडी टाळण्यासाठी मानपाड्यावरून आतील रस्त्यावरून मुख्यालयात जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एमएमआरडीए, मेट्रो, वाहतूक पोलीस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना तातडीने उपाय करण्याचे आदेश त्यांनी दिले. मलनि:सारणवाहिनीचे ब्रह्मांड ते डी मार्टपर्यंतचे काम १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करावे, उर्वरित काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याच्या आणि मेट्रोच्या कामासाठी आवश्यकतेनुसारच बॅरिकेडस् लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या.सेवा रस्त्यांवर एकाच बाजूने पार्किंगघोडबंदरचे दोन्ही बाजूंचे सेवारस्ते गॅरेजचालकांनी व्यापल्याने कोंडीत भर पडते. त्यामुळे कापूरबावडी ते भार्इंदरपाडापर्यंत सर्व गॅरेज शुक्रवारपासून बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी वाहतूक पोलिसांसह पालिकेच्या अधिकाºयांना दिले. याशिवाय, सेवारस्त्याच्या डाव्या बाजूला एकाच लेनमध्ये वाहने उभी करावीत, अशी सूचनाही त्यांनी केली. विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस सुहास देसाई यांनी या आशयाच्या मागणीचे पत्र आयुक्तांना दिले होते.अंतर्गत रस्त्यांच्या कामांचे स्टेटस तपासून निविदा काढावाहतूककोंडीवर उपाय करण्यासाठी या अंतर्गत रस्त्यांची कामे सद्य:स्थितीत कोणत्या पातळीवर आहेत, निविदा काढल्या गेल्या आहेत किंवा नाही, हे तपासताना त्या लवकर काढून ही कामे जूनपर्यंत पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले.सुरळीत वाहतुकीसाठी अतिरिक्त वॉर्डनवाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांचे बळ कमी पडत आहे. त्यासाठी मेट्रोनेसुद्धा या भागात वॉर्डन द्यावेत, तसेच महापालिकेच्या माध्यमातूनही अतिरिक्त वॉर्डन देण्याची कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.बेवारस आणि जप्तीची वाहने हलवा : घोडबंदर भागात अनेक ठिकाणी बेवारस आणि पोलिसांनी जप्त केलेली वाहने सेवारस्त्यांवर उभी केली आहेत. ती तत्काळ हटवण्याची कारवाई करावी आणि ही वाहने ठेवण्यासाठी तूर्तास बोरिवडे येथील जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.खोदकामासाठी इतर संस्थांशी दोन दिवसांत पत्रव्यवहार करासध्या घोडबंदर भागात जे खोदकाम सुरू आहे, त्या अनुषंगाने महावितरण असेल किंवा इतर खाजगी संस्थांना काही कामे करण्यासाठी खोदकाम करायची असतील, तर त्यांनी दोन दिवसांत पत्रव्यवहार करा, अशा सूचना देतानाच त्यानंतर जर खोदकामाकरिता संबंधितांनी परवानगी मागितली, तर ती दिली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.खाजगी शाळांच्या बस रस्त्यावरून हटवणेया भागात खाजगी शाळांच्या बसगाड्या या सेवारस्ता आणि मुख्य रस्त्यांवर उभ्या असतात, त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करावी किंवा संबंधित शाळा व्यवस्थापनाने शाळेच्या आवारात बस पार्किंगची सुविधा करून द्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.- जलवाहिन्या आणि मलनि:सारणवाहिन्या टाकण्याचे काम दोन्ही विभागांनी एकाचवेळी पूर्ण करावे. डाव्या बाजूकडील कामे पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उजव्या बाजूकडील सेवारस्त्यांवर कामे करु नये. सेवारस्त्यावर खोदकाम पूर्ण झाल्यास, तिथे तत्काळ डांबरीकरण करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. या आदेशांचे पालन होत असल्याची खात्री करण्यासाठी दरमहा आढावा बैठक होणार आहे.

टॅग्स :thaneठाणे