लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: तौक्ते चक्र ीवादळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मोठया होर्डिंगमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी सर्व होर्डिंगच्या स्थितीची तपासणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. सर्व सहाय्यक आयुक्तांना हे आदेश दिल्यानंतर रविवारी सकाळपासून होर्डिंग्जच्या तपासणीचे काम सुरू झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार अरबी समुद्रात ‘तौकते’ नावाचे चक्र ीवादळ मुंबई तसेच नजीकच्या समुद्रातून जाणार आहे. त्याचा प्रभाव हा काही प्रमाणात मुंबई, ठाणे येथील वातावरणावर होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने वेगाने वारे वाहण्यासह पर्जन्यवृष्टी देखील होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी महापालिकेच्या सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क आणि सुसज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरात ठिकठिकाणी उभे केलेले होर्डिंग्ज चक्र ी वादळामुळे पडून कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी सर्व होर्डिंग सुस्थितीत आहेत का? याच्या तपासणीचे आदेश सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार प्रभाग समिती निहाय शहरातील होर्डिंगची तपासणी करण्याचे काम रविवारी सुरू केल्याची माहिती पालिकेने दिली.
चक्र ीवादळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व होर्डिंगची तपासणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 10:04 PM
तौक्ते चक्र ीवादळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मोठया होर्डिंगमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी सर्व होर्डिंगच्या स्थितीची तपासणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.
ठळक मुद्दे महापालिका आयुक्तांनी दिले आदेश