शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

जालना येथील लाठीचार्जच्या निषेधार्थ उल्हासनगरात सकल मराठा समाजाचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2023 4:22 PM

- सदानंद नाईक  उल्हासनगर : जालना येथील लाठीचार्जच्या निषेधार्थ सकल मराठा समाजच्यावतीने शिवाजी चौक ते प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात ...

- सदानंद नाईक उल्हासनगर : जालना येथील लाठीचार्जच्या निषेधार्थ सकल मराठा समाजच्यावतीने शिवाजी चौक ते प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बांगड्या भेट म्हणून पाठविणार असल्याचे महिलांनी सांगितले. 

जालना येथील मराठा उपोषणकर्त्यावर अमानुष लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ शहरातील सकल मराठा समाजातील शेकडो जण दुपारी छत्रपती शिवाजी चौक येथे एकत्र आले. यावेळी सर्वांनी जालना येथील लाठीचार्जचा निषेध करून राज्य सरकारचा धिक्कार केला. तसेच लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बांगड्या पाठविणार असल्याची प्रतिक्रिया महिलांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रांत कार्यालय दरम्यान मराठा समाजाने मोर्चात शेकडो जण सहभागी झाले होते. सुनीता गव्हाणे व ज्ञानेश्वर करवंदे यांच्यासह अन्य जणांनी मोर्चाचे नेतृत्व केले. 

प्रांत कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर सकल मराठा समाजाने राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. लाठीचार्ज करणाऱ्या व लाठीचार्जचा आदेश देणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनद्वारे प्रांत अधिकाऱ्यांना करण्यात आली. शहरातून निघालेल्या सकल मराठा समाजाच्या मोर्चात शेकडो जणांनी सहभाग घेतला. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. मोर्चाच्या वेळी सर्वाधिक घोषणा व रोष गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यावर असल्याचे उघड झाले. शांततेच्या मार्गाने चाललेल्या लढ्याला जालना येथील घटनेने गालबोट लागले असून लाठीचार्जचा आदेश देणाऱ्याचे नाव राज्य सरकारने घोषित करण्याची मागणी मोर्चातून झाली. प्रांत कार्यालयाला निवेदन दिल्यावर मोर्चातील शेकडो नागरिक शांततेने घरी गेले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण