शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
2
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
3
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
4
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
5
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
6
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
7
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
8
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
9
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
10
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
11
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
12
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
13
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
14
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
15
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
16
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
17
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
18
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
19
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार

गाठीशी असलेले सगळे पैसे संपलेत...तुम्हीच सांगा पोटाची खळगी कशी भरायची?

By जितेंद्र कालेकर | Published: May 05, 2020 1:44 AM

जवळचे सर्व पैसे संपले. त्यामुळे पोटाची खळगी कशी भरायची? तुम्हीच सांगा? असा सवाल वर्तकनगर पोलीस ठाण्याबाहेर रविवारी अर्ज देण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या श्रावणकुमार चमार याच्यासह अनेकांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला. पोलीस, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून योग्य माहिती दिली जावी. तसेच यासाठी एक खिडकी योजनाही अमलात आणावी, अशी मागणीही या मजूरांनी केली आहे.

ठळक मुद्देशासकीय यंत्रणेतील समन्वयाअभावी ठाण्यात परप्रांतीय मजूरांचे हालअनेकांच्या पोलीस ठाण्याबाहेर रांगा

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: गाठीशी असलेले दहा हजार रुपये गेल्या ४० दिवसांमध्ये संपले. आता रोजचा दिवस कसा काढायचा. पोटाची खळगी कशी भरायची? तुम्हीच सांगा? असा सवाल वर्तकनगर पोलीस ठाण्याबाहेर रविवारी अर्ज देण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या श्रावणकुमार चमार याच्यासह अनेकांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला. पोलीस आणि महापालिका यांच्यातील योग्य समन्वयाअभावी तसेच योग्य माहिती न मिळाल्यामुळे अशा अनेक मजूरांचे हाल होत आहेत.माजीवडा भागात राहणारा श्रावणकुमार (३०) हा मुळचा उत्तरप्रदेशातील गोरखपूरचा आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो स्टाईल बसविण्याचे नेताराम या ठेकेदाराकडे काम करतो. गावी आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. गाठीला जे दहा हजार रुपये होते. तेही आतापर्यंतच्या जेवणासाठी संपले. कोणी तरी अन्नदान करतो. पण त्यांच्या देण्याचा आणि देण्याच्या वेळेचा कोणताही भरवसा नाही. मग पोटातील भूकेची आग कशी विझवणार? असा रोजचा प्रश्न आहे. त्यासाठीच गावी जायचे आहे. पण त्यासाठीही डॉक्टरांना २५० ते ३०० रुपये मोजावे लागतायेत. पोलीस ठाणे, डॉक्टर आणि पुन्हा नगरसेवक यांच्याकडे फेऱ्या माराव्या लागताहेत. योग्य माहितीही कुठे मिळत नाही. जीव अगदी मुठीत आला आहे. हरीश चव्हाण (२२, रा. माजीवडा, ठाणे) हाही असाच एक स्टाईल कारागिर आहे. त्याचीही अशीच अवस्था असल्याचे त्याने सांगितले. सॅनिटायझरने हात धुणे सोडा, रोजच्या जगण्यासाठीच पैसे नाहीत. प्रत्येक गोष्टीची समस्या आहे. मग इथे राहण्यापेक्षा गोरखपूर (उत्तरप्रदेश) या आपल्या गावी जाणार आहे. पण पोलीस ठाण्यात अर्ज देण्याची, पुन्हा डॉक्टरकडे जाण्याची रांग मोठी असल्याने गेली दोन दिवस फेºया मारतोय. आता करायचे काय? पाणी पिऊन भूक भागवतोय, असेही त्याने सांगितले. गावी जाण्यासाठीचा जो अर्ज एका दुकानात दिला जातोय त्याची किंमतही ३० रुपये तर अन्य एका टोकनसाठी २० रुपये सोसावे लागतायेत. अशा वेळी तरी अशी लूटमार व्हायला नको, अशीही अपेक्षा त्याने व्यक्त केली. तर अन्य एका झारखंडच्या मजूरानेही अशीच तक्रार केली.* दरम्यान, पोलीस, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून योग्य माहिती दिली जावी. तसेच यासाठी एक खिडकी योजनाही अमलात आणावी, अशी मागणीही या मजूरांनी केली आहे.* यासंदर्भात वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणाले की, बाहेरगावी जाणा-याने तो कंटेनमेंट झोन मधील रहिवाशी नसल्याचे नगरसेवक किंवा प्रभाग अधिका-याचे प्रमाणपत्र आणावे. तसेच वैद्यकीय तपासणीचे नोंदणीकृत डॉक्टरकडून प्रमाणपत्र आणणे गरजेचे आहे. शिवाय, तो कोणत्या गाडीने कधी आणि किती जणांसोबत जाणार याचाही तपशील त्याने अर्जात उल्लेख करावा. सध्या तरी रेल्वेची सुविधा नाही. त्याने खासगी वाहन करणे अपेक्षित आहे. अर्जासाठी त्यांच्याकडून अतिरिक्त कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याचा दावाही त्यांनी केला. परिपूर्ण भरलेला एकही अर्ज अद्याप प्राप्त झाला नसल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेLabourकामगारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस