मुंब्रा : मुसलमानांमध्ये फूट पाडून सर्वच पक्षांनी त्यांचा मतांसाठी वापर केल्याचा आरोप एमआयएमचे अध्यक्ष अकबरुद्दीन ओवेसी यांनी मुंब्य्रातील जाहीर सभेत केला. भाजपा आणि शिवसेनेत सध्या सुरू असलेले भांडण हे नाटक असून एमआयएमच्या राज्यातील सक्रि य राजकीय सहभागामुळे राष्ट्रवादीला भाजपाप्रति असलेल्या त्यांच्या सहानुभूतीच्या भावनेत बदल करावा लागल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले. ७० वर्षांच्या स्वातंत्र्याच्या काळात स्थापन करण्यात आलेल्या विविध कमिट्यांनी मुस्लिम समाज मागासलेले जीवन जगत असल्याचा रिपोर्ट दिला. परंतु, एकाही सरकारने त्यांच्या परिस्थितीत सुधारणा व्हावी, यासाठी उपाययोजना केली नसल्याचे ते म्हणाले. एका खाजगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंब्य्रातील ५० टक्के नागरिकांकडे शिधापत्रिका नाही. यामुळे त्यांना अनेक शासकीय सुविधांपासून वंचित राहावे लागते. तसेच येथील नागरिकांसाठी रुग्णालये, शाळा, पाणी यासारख्या मूलभूत पायाभूत सुविधा पर्याप्त प्रमाणात उपलब्ध नाहीत. मात्र, तरीही मुंब्य्राचा विकास झाल्याचा दावा करण्यात येत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. (वार्ताहर)
‘सर्वपक्षीयांनी मुस्लिमांचा मतांसाठी वापर केला’
By admin | Published: February 17, 2017 1:54 AM