ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा शिवसेनेचे राजन विचारे यांनी विक्रमी चार लाख १२ हजार १४५ एवढ्या फरकाचे मताधिक्य मिळवून राष्टÑवादीचे आनंद परांजपे यांचा पराभव केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही आघाडीला शिवसेनेचा गड खेचण्यात अपयश येणार, हे आता जवळजवळ निश्चित मानले जात आहे.
राजन विचारे यांचे शिक्षण अकरावीपर्यंत झाले आहे. त्यांची सातवी निवडणूक होती. या निवडणुकीत आधीच त्यांनी आपण साडेतीन ते साडेचार लाख मतांच्या फरकांनी विजयी होऊ, असा दावा केला होता. तो खरा ठरला आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून विचारे यांनी आघाडी घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे चौथ्या फेरीत निर्विवाद ४८ हजारांच्यावर आघाडी घेतल्याने राष्टÑवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला. दरम्यान, रात्री ११.४० वाजता ३४ फेºया झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी निकाल जाहीर केला. यावेळी विजयी राजन विचारे यांना तब्बल सात लाख ४० हजार ९६९ मते मिळाली. मागील वेळेस त्यांना विचारे यांना पाच लाख ९५ हजार ३६४ मते मिळाली होती. त्यात यंदा तब्बल एक लाख ४५ हजार ६०५ मतांची वाढ झाल्याचे दिसून आले. एकूण मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास मागील वेळेपेक्षा ६.८४ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर, दुसºया क्रमांकावरील राष्टÑवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना तीन लाख २८ हजार ८२४ मते मिळाली. मागील वेळेस राष्टÑवादीचे उमेदवार संजीव नाईक यांना तीन लाख १४ हजार ६५ मते मिळाली होती. मागील वेळेच्या तुलनेत राष्टÑवादीचे मताधिक्य हे १४ हजार ७५९ मतांनी वाढल्याचे दिसून आले.
मताधिक्य वाढले असले, तरी मागील वेळेच्या तुलनेत टक्केवारीत घट झाल्याचे दिसून आले. यंदा १.६९ टक्के घट झाल्याचे दिसून आले आहे. तर, मागील वेळेस मनसेच्या मनसेचे अभिजित पानसे यांना ४८ हजार ८६३ आणि आपचे संजीव साने यांना ४१ हजार ४९९ मते मिळाली.
परंतु, यंदा मनसे आणि आप या दोनही पक्षांनी निवडणूक न लढवल्याने त्या दोघांच्या मतांचा फायदा हा राष्टÑवादीच्या उमेदवाराला होऊ शकतो, असा कयास लावला जात होता. परंतु, तो फोल ठरला आहे.
मनसेची मते तर नाहीच नाही, शिवाय आपची मतेही राष्टÑवादीच्या वाट्याला आलेली नाहीत. त्यात, शिवसेनेला भाजपची साथ लाभल्याने त्याचा फायदा विचारे यांना झाल्याचे दिसून आले. परंतु, राष्टÑवादीला काँग्रेसची साथ न लाभल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याचाही फटका राष्टÑवादीला बसल्याचे बोलले जात आहे. आघाडीला मेहनत करावी लागणार हे निश्चित.एकूणच मागील वेळेच्या तुलनेत यंदा जी तीन लाखांहून अधिकची मते वाढली, त्यातील दीड लाखाच्या आसपास मतांचा फायदा हा शिवसेनेच्याच उमेदवाराला अधिक झाल्याचे दिसून आले. याचाच अर्थ नवमतदारांनी पुन्हा मोदींवर विश्वास टाकल्याचे दिसून आले असून त्यामुळेच विचारेंच्या मतांतही वाढ झाल्याचे यंदाच्या मोजणात दिसत आहे.
या निवडणुकीत मनसे किंवा आपचे उमेदवार नसले, तरी वंचित बहुजन आघाडी यात उतरल्याने त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, त्याचा फटका नवी मुंबईत राष्टÑवादीलाच बसल्याचे दिसून आले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मल्लिकार्जुन पुजारी हे नवी मुंबईतील स्थायिक असल्याने त्यांना या पट्ट्यातूनच अधिक मते मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.शिवसेनेने ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, मीरा-भार्इंदर, ऐरोली आणि बेलापूर या सहा विधानसभेत पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली आहे. याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत दिसून येणार आहे. युतीच्या हातून हे सर्व विधानसभा मतदारसंघ काढण्यासाठी आघाडीला कसरत करावी लागणार आहे. मागील वेळेस १३ हजार १७४ मतदारांनी नोटाला पसंती दिली.