शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

उत्तनच्या डम्पिंगलासारखी आग लागण्यामागे ठेकेदार व अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण संगनमत असल्याचा आरोप

By धीरज परब | Published: April 04, 2024 6:27 PM

मीरा भाईंदर महापालिकेला शासना कडून उत्तन धावगि येथे घनकचरा प्रकल्प राबवण्यासाठी मोफत जागा मिळाली असताना पालिकेने येथे बेकायदा डम्पिंग ग्राउंडच तयार केले आहे. 

मीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथील डम्पिंगला सातत्याने आगी लागण्या मागे विविध कामांच्या ठेकेदारांचे व अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण संगनमत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे उत्तन पोलीस ठाण्यातील गुन्ह्याचा तपास काटेकोर झाल्यास अनेक घोटाळे बाहेर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

मीरा भाईंदर महापालिकेला शासना कडून उत्तन धावगि येथे घनकचरा प्रकल्प राबवण्यासाठी मोफत जागा मिळाली असताना पालिकेने येथे बेकायदा डम्पिंग ग्राउंडच तयार केले आहे. या ठिकाणी पूर्वीपासून प्रक्रिया न  केलेला कचऱ्याचा डोंगर निर्माण झाला आहे. त्याठिकाणी रोजचा येणारा शहरातला सुमारे  ४५० ते ५५० टन ओला आणि सुका कचरा वर प्रक्रिया करण्यासाठी एन्वायरो प्रोजेक्ट हा ठेकेदार पालिकेने नेमला आहे.  सदर ठेकेदार हा सर्वच कचऱ्यावर प्रक्रिया करत नाही तर काही प्रमाणातील कचऱ्यावरच प्रक्रिया करतोय. शिवाय रोज येणारा कचरापैकी सुमारे ५० टक्के कचरा वर्गीकरण केलेला नसल्याने त्यावर प्रक्रिया करणे अवघड होऊन तेथे रोज कचऱ्याचा डोंगर वाढीला लागलेला आहे. 

पूर्वीच्या सुमारे १० लाख टन इतक्या साचलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंग करायचे म्हणून पालिकेने कोट्यवधींचा ठेका ठेकेदारास दिला आहे. तर रोजचा येणाऱ्या कचरा सपाटीकरण करण्यासाठीचा वेगळा ठेका गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठेकेदारास आंदण असल्यागत आहे. तर आग लागली की काही गावातील ग्रामस्थच पाणी टँकरने पुरवण्याचे काम करत आहेत. 

उत्तन डम्पिंगला सतत आग लागून विषारी धूर पसरून तसेच रोजची दुर्गंधी यामुळे लोकांना श्वास घेणे अवघड झाले आहे. नुकत्याच लागलेल्या आगीमुळे परिसरात ऐन धार्मिक उत्सव काळात परिसरात धुराचे साम्राज्य पसरले. त्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त करत शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देत डम्पिंग बंद करण्याची मागणी केली . 

दरम्यान आग लावण्यात आल्याच्या पालिकेच्या फिर्यादी नंतर उत्तन सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचा तपास पोलीस करत असतानाच कचऱ्याला आग लावण्यामागे पालिकेचे ठेकेदार व अधिकारी यांच्यातील संगनमत तर कारणीभूत नाही ना? असा प्रश्न केला जात आहे. कारण धावगी येथे कचरा साठवण्यास जागा नसल्याने तसेच रोज येणाऱ्या कचऱ्यासाठी जागा करायची असल्याने लेव्हलिंगचा ठेकेदार काम करतो. तर साचलेल्या कचऱ्याचा डोंगर वर बायोमायनिंग चा ठेकेदार सुद्धा काम करतो. त्यामुळे कचऱ्याला आग लागल्याने ती दोन चार दिवस धुमसत राहून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा हा जाळून गेला आहे. कचरा जळून गेल्याने ठेकेदारांनी त्याचा फायदा होत असल्याचे आरोप होत आहेत. शिवाय आग लागल्यावर टँकरने पाणी पुरवणारे स्थानिक ठेकेदार यांचा सुद्धा आर्थिक फायदा होत असतो. 

त्यामुळे आतापर्यंत आग डम्पिंगला मिथेन आदी वायूमुळे आग लागते असा दावा पालिका करत आली होती. परंतु आयुक्तांच्या आदेशाने आग लावण्यात आल्याचा गुन्हा दाखल झाल्याने आता या ठिकाणी संबंधित विविध ठेकेदार आणि पालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने आगी लावण्यामागे यांचे संगनमत असल्याचा आरोप पुन्हा स्थानिकांनी चालवला आहे. तर आग रोखण्यासाठी पालिकेने या ठिकाणी पुन्हा सीसीटीव्ही बसवणे, सुरक्षा रक्षक नेमणे पासून विविध उपाय योजना केल्या जात असल्याचा दावा केला आहे . 

टॅग्स :fireआगmira roadमीरा रोड