ठाणे : पोलिसांचा वापर करून भाजपा दहशतवाद पसरवते आहे. त्यांना तोंड देण्यासाठीच शिवसेनेने राष्ट्रवादीला सोबत घेतले आहे, अशा आरोपांची तोफ डागत जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या प्रचाराची सांगता केली; तर शिवसेनेला थोपवण्यासाठीच भाजपाने श्रमजीवीला सोबत घेत जशास तसे उत्तर दिल्याचे प्रत्त्युत्तर देत भाजपाने आपल्या प्रचाराला पूर्णविराम दिला. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी, चौकसभा, प्रचारसभा, पदयात्रांवर भर देत सोमवारी रात्री ठाणे जिल्हा परिषद आणि भिवंडी, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ आणि कल्याण पंचायत समितीच्या प्रचाराची उत्साहात सांगता झाली. बुधवारी १३ डिसेंबरला मतदान, तर गुरूवारी मतमोजणी होणार आहे. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असले तरी ठाणे जिल्ह्यातील प्रमुख आमदारांनी मात्र या निवडणुकीसाठी आपापल्या मतदारसंघातच तळ ठोकल्याचे दृश्य पाहायला मिळाले. परस्परविरोधी विचारसरणी असलेले पक्ष एकत्र आल्याने स्थानिक नेते वगळता राज्यातील अन्य प्रमुख नेत्यांनी मात्र या प्रचाराकडे पाठ फिरवलीं.भाजपा दहशतवादी : शिंदेमुुरबाड : पोलिसांचा वापर करत भाजपा दहशतवाद पसरवत असल्याचा आरोप पालकमंत्री एतनाथ शिंदे यांनी धसई-सरळगावच्या सभेत केला. तालुक्यात परिवर्तन घडवण्यासाठीच शिवसेनाने राष्ट्रवादीला सोबतघेतल्याचा दावाही त्यांनी केला. तर राष्ट्रवादीचे नेते गोटीराम पवार यांनीही या युतीमुळे गुंडगिरीला आळा घातला जाईल, असे सांगितले. दोन्ही नेत्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांवर टीका केली.तालुक्यात वाढलेल्या समस्या आणि भाजपाच्या मनमानीवर शिवसेना-राष्ट्रवादीची युती हाच पर्याय असल्याचा दावा शिंदे यांनी केला. जिल्हा नियोजन मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी विकासाची कामे मंजूर करून घेतो. पण त्याचे श्रेय घेण्याचे काम भाजपा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. खोट्या केस दाखल करण्याचे धंदे पोलिसांनी करू नयेत.या बाबत मी वरिष्ठ पोलीस अधिकाºयांना भेटून सांगितले आहे. धमक्यांचा पत्ता गुल करण्याची संधी सोडू नका, असे आवाहन त्यांनी केले . बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचे आमदार किसन कथोरे यांनी बदलापूर-अंबरनाथवरून माणसे आणून गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केला. शिवसेना सोबत असल्याने तो हाणून पाडल्याचा दावा माजी आमदार गोटीराम पवार यांनी केला.खासदारांच्या पुतण्यामुळे अंजूर वेहळे गटाकडे लक्ष१अनगाव : भिवंडी तालुक्यातील अंजूर वेहळे जिल्हा परिषद गटातील लढतीकडे भाजपा, श्रमजीवी संघटना, आरपीआय आघाडीचे उमेदवार आणि भाजपाचे खासदार कपिल पाटील यांचे पुतणे, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष देवेश पुरूषोत्तम पाटील यांच्यामुळे सर्वांचे लक्ष लागले आहे.२त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करण्याचे कपिल पाटील यांचे स्वप्न आहे. त्यांच्याविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आरपीआय सेक्यूलर महायुतीने दिलेले भिवंडी पंचायत समितिचे माजी उपसभापती असलेले शिवसेनेचे महादेव बलीराम घरत उभे असून दोघांत काँटे की टक्कर होण्याची चिन्हे आहेत.३पूर्वीचा काल्हेर-अंजूर गट आता अंजूर वेहळे गट झाला आहे. मागील निवडणुकीत या गटात श्रमजीवी संघटनेचे गोविंद वेडंगे विजयी झाले होते. पण तेव्हा ते राष्टवादीतर्फे निवडून आले होते आणइ सध्या भाजपातच असलेले कपिल पाटील तेव्हा राष्ट्रवादीत होते.४अंजूर गणात भाजपा आघाडीचे जितेंद्र डाकी, युतीचे चेतन तरे, वेहळे गणातून आघाडीच्या भाजपाच्या दर्शना हरेश भोईर, शिवसेनेच्या विद्या प्रकाश थळे रिंगणात आहेत. अंजूर गटात वेहळे, अलम्ीाघर, भरोडी, सुरई, सारंग, पिंपळास, पिंपळनेर, अंजूरदिवे या नऊ ग्रामपंचायतीसह ठाकराचापाडाचा समावेश आहे.५या गटात भाजपासह श्रमजीवी संघटनेची ताकद मानली जाते. येथे श्रमजीवी संघटनेची मते निर्णायक आहेत. देवेश पाटील हे ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाचे दावेदार असल्याने प्रचार त्या पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे शिवसेना किती ताकदीने लढत देते त्यावर येथील चित्र अवलंबून आहे.आरपीआय श्रमजीवीचीभाजपाच्या मागे फरफटमुरबाड : आरपीआय आठवले गट व श्रमजीवी संघटनेसोबत महाआघाडी केली असली, तरी भाजपाने या दोन्ही पक्षांना नावापुरते महत्त्व दिल्याने या दोन्ही पक्षांची फरफट सुरू असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. येथे राष्ट्रवादी मोठ्या भावाची भुमिका बजावत असली, तरी शिवसेनाही लहान भाऊ म्हणून मिळालेला वाटा मान्य करून प्रचारात ताकदीने उतरली आहे.जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत धसई गटातील जागा वाटपावरून शिवसेना-राट्रवादीची युती तुटण्याची वेळ आली होती. प्रसंगी शिवसेनेच्या नेत्यांनी सुभाष घरत यांना भाजपात जाऊ दिले, पण युती तुटू दिली नाही. पंचायत समितीच्या पाच जागा व जिल्हा परिषदेच्या दोन जागा पदरात पाडून घेतल्या. शिवसेनेने घेतलेल्या या धाडसी निर्णयाचा निवडणुकीत कसा फायदा होतो, हे मतमोजणीनंतर दिसून येईल.भाजपाने आरपीआय आठवले गट व श्रमजीवी संघटनेला सोबतीला घेतले. पण त्यात आरपीआयला डोंगरेन्हावे गणातील एकमेव जागा मिळाली. श्रमजीवीला काहीच वाटा न दिल्याने या संघटनेत उत्साह नाही. या संघटनेने गेल्या दोन वर्षात भाजपा सरकार विरोधात सहा ते सात वेळा आंदोलने केली होती. आता मात्र त्याच पक्षाचा प्रचार करण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे.भगवा फडकेल- विचारेकसारा : ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिलला आहे. तेथील प्रमुख महापालिका, नगरपालिका, शहापूर नगरपंचायत, विकासाच्या जोरावर शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यापाठोपाठ आता ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायतींवर भगवा फडकेल, असा दावा ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत केला. खासदार कपिल पाटील यांनी महिनाभरापूर्वी १३ लाख खर्च करून बांधलेल्या रस्त्याची चाळण झाल्याचा दावा तालुकाप्रमुख मारुती धिर्डे यांनी केला आणि भ्रष्टाचाराचा आरोप केला.वाहने एक किमी दूरकसारा : बुधवारच्या मतदानासाठी जिल्हा परिषद व अग्रवाल हायस्कूल बंद राहणार आहेत. कसाºयाहून नाशिक, शिर्र्डी, मालेगाव, वणी, राजूर, अकोला, घोटी, इगतपुरीकडे जाणाºया एसटी, जीप, टॅक्सी आदी वाहने बाजारपेठेपासून एक किमी अंतरावर उभी टेवली जाणार आहेत.छोट्या प्रचारसभांवर भरकल्याण : कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा व पंचायत समितीच्या १२ जागांसाठी विविध पक्षाचे ४५ उमेदवार रिंगणात आहे. त्यांच्या निवडणूक प्रचाराचा धुराळा रात्री शांत झाला. प्रत्यक्ष गाठीभेटी व छोट्या प्रचार सभांवर प्रचाराचा अधिक भर राहिला.भाजप ही स्वबळावर निवडणूकीच्या रिंगणात उतरल्याने कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागांसाठी खासदार कपील पाटील, आमदार किसन कथोरे, आमदार नरेंद्र पवार व कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्र घोडविंदे यांनी कंबर कसली होती. या मंडळीच्या प्रचार सभा झाल्या. अनेकांच्या प्रचाराचा भर हा मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर अधिक होता.काँग्रेस पक्षाने केवळ पाच उमेदवार रिंगणात उभे केल्याने काँग्रेसला प्रचारात भाजपला शह देता आला नाही. तसेच शिवसेना व राष्ट्रवादीची चार गण सोडून अन्य ठिकाणी युती होती. शिवसेना व राष्ट्रवादीने भाजपचा विजयी रथ रोखण्यासाठी ग्रामीण भागाच्या उपेक्षेवर भर दिला. भाजपाने विकासाचे आश्वासन दिले. निवडणूक ग्रामीण भागातील असल्याने जेवणावळींवर अधिक भर देण्यात आला होता.भाजपामधील राष्ट्रवादीला मतदान न करण्याचे आवाहनबदलापूर : उमेदवारी देताना राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या पदाधिकाºयांनाच संधी देण्यात आली. त्यामुळे भाजपाचे निष्ठावंत अडगळीत पडले आहेत. भाजपात सामील झालेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान न करता त्यांची जागा दाखवा, असे आवाहन करून भाजपाचे ठाणे जिल्हा सरचिटणीस शरद म्हात्रे यांनी खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीचे घरभेदी भाजपाचा मुखवटा लावून निवडणूक लढवत असल्याचा आरोप त्यांनी केला. सोशल मीडियावर त्यांचा मेसेज व्हायरल झाल्याने भाजपा नेत्यांत अस्वस्थता आहे.म्हात्रे यांनी आपले राजकारण भाजपामधून केले. ते प्रमोद महाजन यांचे खंदे समर्थक आहेत. ज्या भाजपा कार्यकर्त्यांनी पडतीच्या काळात रक्त आटवून पक्ष जिवंत ठेवला, त्यांनाच भाजपाच्या नेत्यांनी अडगळीत टाकले. ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी निस्वार्थ सेवा केली त्याच कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यापूर्वी आर्थिक वजन किती याची विचारणा केली जाते. भाजपाला आता सुगीचे दिवस असले, तरी भाजपा जिवंत ठेवणाºया कार्यकर्त्यांना मात्र अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला.सत्तेसाठी भाजपात आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि पदाधिकाºयांनी भाजपालाच राष्ट्रवादी बनवण्याची तयारी केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजपामधील या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करू नका, असे आवाहन त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले. या संदर्भात विचारता त्यांनी या मेसेजची कबुली दिली. कोणाला मतदान करा, असे मी म्हणालेलो नाही. मात्र भाजपाचा मुखवटा लावून निवडणूक लढविणाºया राष्ट्रवादीला मतदान करू नका, असे आवाहन मी मतदारांना केले आहे.माझ्या या भूमिकेला भाजपातील निष्ठावंतदेखील समर्थन देत असल्याने मी काय परिणाम होतील, याची पर्वा करत नाही. या आधीपासून मी
आरोप-प्रत्यारोपातच प्रचाराची सांगता, प्रमुख नेत्यांनी प्रचाराकडे फिरवली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 3:31 AM