शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

युतीतील तणावाचे पडसाद ‘स्थायी’त!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 12:52 AM

शिवसेना आणि भाजपची युती तुटण्याच्या परिस्थितीत असताना याचे पडसाद केडीएमसीत येऊ घातलेल्या समित्यांच्या निवडणुकांमध्ये उमटण्याची चिन्हे आहेत.

कल्याण : मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपची युती तुटण्याच्या परिस्थितीत असताना याचे पडसाद केडीएमसीत येऊ घातलेल्या समित्यांच्या निवडणुकांमध्ये उमटण्याची चिन्हे आहेत. साधारण जानेवारीमध्ये स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. आमचाच सभापती असेल असा दावा आतापासूनच केला जाऊ लागल्याने संबंधित पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये सामना होईल, अशी शक्यता आहे. त्यात नोव्हेंबरअखेरीस स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त होत आहेत. त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागांवर गुरुवारी नव्या सदस्यांची नियुक्ती केली जाणार असल्याने समितीवर कोणाची वर्णी लागते? याकडेही लक्ष लागले आहे.जयवंत भोईर, शालिनी वायले, सभापती दीपेश म्हात्रे, निलेश शिंदे, मनोज राय, नितीन पाटील, संदीप पुराणिक, कस्तुरी देसाई हे विद्यमान आठ सदस्य ३० नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. तत्पूर्वी निवृत्त होणाºया सदस्यांच्या रिक्त होणाºया जागांवर गुरुवारी दुपारी दोन वाजता नवीन आठ सदस्यांच्या नेमणुका करण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, पुढील वर्षी आक्टोबरमध्ये केडीएमसीची सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने नव्याने निवडून जाणाºया सदस्यांना केवळ नऊ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. तसाच कालावधी जानेवारीमध्ये निवडून येणाºया सभापतींनाही मिळणार आहे.समितीमधील पक्षीय बलाबल पाहता शिवसेना आठ, भाजप सहा आणि काँग्रेस, मनसे प्रत्येकी एक अशी १६ सदस्य संख्या आहे. ३० नोव्हेंबरला होणाºया निवृत्त होणाºया आठ सदस्यांमध्ये चार सदस्य शिवसेनेचे, तीन भाजपचे आणि एक सदस्य मनसेचा आहे. त्यामुळे त्यांच्या जागी गुरुवारी नव्याने घेतल्या होणाºया सदस्यांमध्ये कोणाची वर्णी लागते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रक्रियेनंतर साधारण जानेवारीमध्ये नवीन सभापतीपदाची निवडणूक होईल. सध्या सभापतीपद शिवसेनेकडे आहे. त्यात पाच वर्षांच्या कालावधीत दोन-दोन वर्षे सभापतीपदाचे वाटप झाले होते. त्यामुळे पुढचा सभापतीही आमचाच असेल अशी भूमिका शिवसेनेची आहे. तर पाचव्या वर्षाचे काहीही ठरलेले नाही, पण महापौरपद आतापर्यंत उपभोगत असलेल्या शिवसेनेने सभापतीपद आम्हाला द्यावे, असे भाजपचे म्हणणे आहे. एकीकडे मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना-भाजपमध्ये वाद सुरू असताना दुसरीकडे जानेवारीत होणाºया सभापतीपदावरून स्थानिक पातळीवर दोघांमध्ये मतभेद असल्याचे स्पष्टहोत आहे.राज्यस्तरावरील वादावरून येथील युतीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना चार वर्षांत दोघांमध्ये अनेक वाद झाले, पण त्याचा परिणाम केडीएमसीतील युतीवर झाला नाही असाही सूर शिवसेना-भाजपमधील एका गटाचा असला तरी आगामी समित्यांच्या निवडणुकांच्या निमित्ताने येथील सत्तेची समीकरणे कशी राहतील? हे लवकरच स्पष्ट होईल, याबाबतच चित्र लवकरच स्पष्ट होतील, असे सूत्रांनी सांगितले.>सभापती आमचाच राहणार!राज्यातील पहिले चित्र स्पष्ट होऊ द्या. त्याशिवाय इथले निर्णय होणार नाहीत. पण तिकडे कोणताही निर्णय झाला तरी आगामी सभापती शिवसेनेचाच बसेल. ठरल्याप्रमाणे दोन वेळेला सभापतीपद भाजपला देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना पुढचे सभापतीपद मिळणार नाही. सभापती आमचाच राहणार आहे, असे कल्याण शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले. तर चार वर्षात दोन वेळेला सभापतीपद मिळाले. पण आता शिवसेनेचे काहीही म्हणणे असू देत. पाचव्या वर्षात कोणाच्या वाट्याला सभापतीपद याबाबत काहीही ठरलेले नाही. सेनेने महापौरपद चार वर्षे भूषवले असल्याने आगामी सभापतीपद आम्हालाच मिळावे,असे भाजपचे नगरसेवक तथा माजी गटनेते वरुण पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका