ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २०२०-२१ साठी ३३३कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा मंजूर करण्यात आला होता. आज उपमुख्यमंत्री तथा वित्तमंंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ठाणे जिल्ह्यासाठी ३९५ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे.
समिती सभागृहात आयोजित
या बैठकीस पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे , गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील,सर्वश्री आमदार श्री.रईस शेख, श्री.बालाजी किणीकर, निरंजन डावखरे,पालक सचिव सुजाता सौनिक, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,मुख्यकार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात सन २०२०- २१ या वर्षामध्ये राबवावयाच्या विविध योजना व त्यासाठी प्रस्तावित नियतव्यय यांचे विभागनिहाय सादरीकरण जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांनी केले. यावेळी ठाणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास, ग्रामपंचायतींना जनसुविधेसाठी विशेष अनुदान तसेच मोठ्या ग्रामपंचायतींना