शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
4
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
5
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
6
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
7
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
9
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
10
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
11
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
12
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
13
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
16
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
17
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
18
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
19
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती

माओवाद्यांना पर्यायी शब्द जातीयवादी, खंडणीखोर - कॅप्टन स्मिता गायकवाड यांचे ठाम प्रतिपादन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 4:02 PM

"शहरी नक्षलवाद: सविधानासमोरील आव्हान " या विषयावर चाललेल्या मुलाखतीत कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी संदर्भ, उदाहरण आणि घटना सांगून शहरी नक्षलवादाची सविस्तर माहिती दिली. 

ठळक मुद्देमाओवाद्यांना पर्यायी शब्द जातीयवादी, खंडणीखोर - कॅप्टन स्मिता गायकवाड"शहरी नक्षलवाद: सविधानासमोरील आव्हान " या विषयावर मुलाखतसंदर्भ, उदाहरण आणि घटना सांगून शहरी नक्षलवादाची दिली सविस्तर माहिती

ठाणे : नक्षलवादाचे सध्याचे स्वरूप वैचारिक नसून तद्दन व्यावसायिक आहे.शोषित, पीडितांच्या लढ्याच्या मुखवटा घेऊन प्रत्यक्षात शोषणच सुरू आहे.सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेला गंभीर धोका उत्त्पन्न केला आहे. जातीयवादी,  खंडणीखोर हे आजच्या माओवादाला पर्यायी शब्द आहेत; असे ठाम प्रतिपादन नक्षलवादाच्या आणि मानवधिकाराच्या अभ्यासक कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी केले. 

ठाण्यातील घंटाळी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त हिंदू जागृती  सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ आयोजित कार्यक्रमात "शहरी नक्षलवाद: सविधानासमोरील आव्हान " या विषयावर कॅप्टन स्मिता गायकवाड यांची जाहीर मुलाखत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कॅप्टन स्मिता गायकवाड बोलत होत्या. सदर मुलाखत पत्रकार मकरंद मुळे यांनी घेतली.तसेच, श्रोत्यांच्या प्रश्नांनाही उत्तर दिली. शहरी नक्षलवाद काल्पनिक नसून, ती वस्तुस्थिती आहे. आता शहरी नक्षलवाद उघडकीस येत असल्याने तो "काल्पनिक" ठरविण्याचा आटापिटा केला जात आहेत. डोंगराळ भागात, आदिवासी क्षेत्रात, दुर्गम परिसरात होणाऱ्या हिंसक कृत्यांना लागणाऱ्या सर्वप्रकारचा पाठिंबा शहरी भागातून होत आहे. असे पाठिंबा देणारे कायद्याच्या चौकटीत आपली कृत्य करत आहेत. स्वयंसेवी संस्थांसारखे समांतर उपक्रम चालवून हिंसेला उत्तेजन दिले जात आहे. मानवी जीवनातील विविध समस्यांची मांडणी करणे, त्याची चर्चा घडवून आणणे, कायदेशीर मार्गाने आंदोलन उभे करणे त्यातून एक अस्वस्थता तयार करणे आणि त्या समस्येवर कोणतेही उत्तर जाणीव पूर्वक न शोधणे ही शहरी नक्षलींची कार्यपद्धती आहे. व्यवस्थेविषयी असंतोष निर्माण करूम व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी पार्श्वभूमी तयार केली जाते. जातीय भेद शोधून त्याआधारे चळवळी सुरू केल्या जातात. बंड, क्रांती, वंचितांना न्याय अशी आकर्षक, प्रभावी मांडणी करून त्याच्या भोवती समर्थनाचे आवरण तयार केले जाते. सांस्कृतिक, वैचारिक, सामाजिक क्षेत्रात एक भोवताल निर्माण केले जाते. मानवतावादाचा कायदा सोईने वापरला जातो. विविध काल्पनिक संकल्पना मांडून त्याच योग्य, सत्य असल्याचे बिंबवले जाते. हा सगळा प्रकार शहरी नक्षलवादच आहे असे सांगून कॅप्टन स्मिता गायकवाड आपल्या मुलाखतीत पुढे म्हणाल्या, हे सगळं आपल्या अवतीभोवती घडत असते मात्र आपल्याला त्याची कल्पना येत नाही. घटना, वक्तव्य काळजीपूर्वक बघितल्यास त्या एकमेकांशी जोडल्यास हे समजून येईल. माओवाद हा आदिवासींच्या  भल्यासाठी नसून आदिवासी हे केवळ माओवादासाठी वापरले जात आहेत. शहरी नक्षलवाद ही  संकल्पना नवीन नसून सत्तरच्या दशकात पहिली माओवादी फ्रंट ऑर्गनायझेशन सुरू झाली होती. माओवादी ,फुटीरतावादी  हे येथीलच सामान्य माणसांची दिशाभूल करून, त्यांना फसवी आश्वासन देऊन देश विरोधी लढाईसाठी उभे करत आहेत. लढणाऱ्यांना आपण नेमके काय करत आहोत, हेच कळत नसते. ते माओवाद्यांना आपले प्रेषित समुजन काम करत असतात.सुरक्षा यंत्रणेबरोबर होणारी चकमक, धरपकड यात ही मंडळी अडकतात. मग, शहरी नक्षलवादी त्याचेही भांडवल करतात. देशात आपल्याच नागरिकांवर अत्याचार होत आहे असाही आवाज उठवतात,  सुरक्षा यंत्रणेविषयी गैरसमज निर्माण करतात. येथील कायद्यांचा गैरवापर करून  सुरक्षा यंत्रणांवर दबाव आणला जातो. या प्रकाराला उत्तर देताना सामान्य माणसांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. नक्षलविरोधी लढाई ही केवळ सशस्त्र सेनादले लढू शकणार नाहीत, असे कॅप्टन स्मिता गायकवाड म्हणाल्या. माओवादी "मास ऑर्गनायझेशन"च्या माध्यमातून ही लढाई लढत आहे. त्याला उत्तर देण्यासाठी सामान्य माणसांनाच आपल्याला क्षमतेनुसार काम करावे लागेल. नक्षलवादाला अनेकदा अज्ञानातून सहानुभूती मिळते. माओवादाचे समर्थन करणे हे पुरोगामीत्व समजले जाते. माओवादा विषयी असलेल्या भाबड्या समजूती घातक आहेत. नक्षलवाद हे आपल्या संविधानासमोरील एक मोठे आव्हान आहे. त्यांची कार्यपद्धती, त्यांचे साहित्य, घोषणा, मांडणी याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. केवळ टिका, थट्टा आणि उपेक्षा करून चालणार नाही. मानवाधिकार हे सगळयांसाठी आहेत. त्याचा वापर करण्यासाठी पुढे आले पाहिजे.वेळीच सावध झाले पाहिजे अन्यथा हा धोका पुढिल पिढीसाठी त्रासदायक ठरेल, असे कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी मुलाखतीच्या शेवटी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMaharashtraमहाराष्ट्र