शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

  मीरारोडमध्ये साकारणार अमर जवान स्मारक, शहीद मेजर कौस्तुभ राणेच्या बलिदानातून मिळाली प्रेरणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2019 5:14 PM

काश्मीर येथे दहशतवाद्यांच्या हल्लयात मीरारोडचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्याने त्यांच्या या बलिदानातून प्रेरणा मिळालेले हिमेश शहा सृष्टी परिसरातील सेक्टर ३ गृहसंकुलाच्या मैदानात आपले सहकारी व सृष्टी गृहसंकुल फेडरेशनच्या सहकार्याने अमर जवान स्मारक येत्या १५ जानेवारी रोजी साकारणार आहेत.

- राजू काळे  भाईंदर - काश्मीर येथे दहशतवाद्यांच्या हल्लयात मीरारोडचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्याने त्यांच्या या बलिदानातून प्रेरणा मिळालेले हिमेश शहा सृष्टी परिसरातील सेक्टर ३ गृहसंकुलाच्या मैदानात आपले सहकारी व सृष्टी गृहसंकुल फेडरेशनच्या सहकार्याने अमर जवान स्मारक येत्या १५ जानेवारी रोजी लष्कर दिनाचे औचित्य साधून साकारणार आहेत. शहरातील प्रत्येकाच्या मनात देशप्रेम कायम जागृत रहावे, त्यांचे ऊर शहीद जवानांच्या त्यागामुळे सतत अभिमानाने भरुन यावे, असा उद्देश यामागे ठेवण्यात आल्याचे शहा यांनी सांगितले. देशाच्या सीमेवर जवानांचा खडा पहारा असल्यानेच आपण सुरक्षित असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करुन त्यातूनच शहीद स्मारक साकारण्याच्या संकल्पनेने गेल्या अनेक वर्षांपासून डोक्यात चळवळ उभी केली होती. त्यातच गेल्या वर्षी मीरारोड येथील मेजर कौस्तूभ राणे दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत शहीद झाले. त्यांच्या बलिदानामुळे शहर भावनाविवश झाले होते. परंतु, मला त्यातून सुरू असलेल्या चळवळीला अंतिम स्वरुप देण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. जवानांच्या बलिदानानंतर अथवा स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, क्रांती दिनावेळीच लोकांच्या मनात देशभक्तीची भावना उफाळून येते. या मर्यादित देशभक्तीला कायमस्वरुपी तेवत ठेवण्यासाठी त्यांनी स्मारक साकारण्याची संकल्पना आपले सहकारी तसेच सृष्टी गृहसंकुल फेडरेशनच्या पदाधिकाय््राांसमोर मांडली. त्यांना शहा यांची संकल्पना आवडल्याने त्यांनी गृहसंकूलातीलच मैदानात स्मारक साकारण्यास शहा यांना परवानगी दिली. याच गृहसंकुलात लष्करातून निवृत्त झालेले २१ जवान वास्तव्य करीत असून त्यांची माहिती शहराला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त करुन त्यासाठीच स्मारक साकारण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्मारकात अमर जवानाची साडेपाच फूटी प्रतिकृती साकारण्यासाठी त्यांनी दहिसर येथील मुर्तीकार किणी यांना सांगितले. 

जवानाची प्रतिकृती अंतिम टप्प्यात असुन येत्या १५ जानेवारीच्या लष्कर दिनाचे औचित्य साधून त्याचे अनावरण वरीष्ठ नाविक अधिकारी (कोमोडोर) तथा मुंबई माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बिमन मेस्त्री यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. एका गृहसंकुलात तेथीलच रहिवाशांच्या मदतीने साकारण्यात येणारे हे स्मारक पहिलेच ठरणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.  

टॅग्स :mira roadमीरा रोडthaneठाणे