अंबरनाथ - अंबरनाथ नगपरिषदेचा 2019-20 चा अर्थसंकल्प पालिका सबागृहात मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. या अर्थसंकल्पीय बैठकीची सुरुवात आणि शेवट हा शिवसेना नगरसेवकांच्या वादावादीतुनच झाला. गोंधळाच्या वातावरणात अर्थसंकल्पावर कमी तर एकमेकांची दुखणी बाहेर काढण्यावरच सर्वाधिक चर्चा झाली. या गोंधळाच्या वातावरणातच पालिकेच्या 304 कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.
मुख्याधिकारी देविदास पवार आणि लेखापाल किरण तांबारे यांनी या वर्षीचा अर्थसंकल्प हा नगराध्यक्ष मनिषा वाळेकर यांच्याकडे सादर केला. या अर्थसंकल्पावर या आधीच स्थायी समितीमध्ये चर्चा करुन हा अर्थसंकल्प अंतिम मंजुरीसाठी पालिकेच्या सभागृहात ठेवण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण, भाजी मंडई, फिश मार्केट यांच्यासाठी कोणतीही खास तरतुद करण्यात आली नाही. तर यांदाच्या अर्थसंकल्पात उद्यान, रस्ते, घनकचरा व्यवस्थापनावर सर्वाधिक खर्चाची तरतुद करण्यात आली आहे. सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात गेल्या अर्थसंकल्पातील शिल्लकर रक्कम 29 कोटी 98 लाख दर्शविण्यात आली आहे. तर महसुली उत्पन्न 162 कोटी रुपये आणि भांडवली उत्पन्न 111 कोटी 90 लाख दर्शविण्यात आली आहे. एकुण 303 कोटी 98 लाखांच्या या अर्थसंकल्पात महसुली खर्च 122 कोटी 16 लाख रुपये तर भांडवली खर्च हा 181 कोटी 76 लाख दर्शविण्यात आले असुन या अर्थसंकल्पात एकुण 303 कोटी 92 लाखांचा खर्च अपेक्षित करण्यात आली आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात उत्पन्नाच्या स्त्रोतात खालील बाबींचा समावेश करण्यात आला आहे. त्यात मालमत्ता करापासुन 39 कोटी 93 लाख, शासनाकडुन येणारा कचराचा हिस्सा 8 कोटी 63 लाख, शासकीय अनुदान आनि अर्थसहाय्य 76 कोटी 13 लाख, पालिकेच्या मालमत्तापासुन भाडय़ांचे उत्पन्न 1 कोटी 52 लाख, फी वापर आकार आणि द्रव्यदंड 8 कोटी 50 लाख, विकास अधिभार फीच्या स्वरुपात 20 कोटी 50 लाख आणि इतर उत्पन्न 6 कोटी 86 लाख असे एकुण 162 कोटी महसूली उत्पन्न दर्शविण्यात आले आहे. तर भांडवली उत्पन्नात 14वा वित्त आयोग अनुदान 25 कोटी, प्रधानमंत्री आवास योजना 5 कोटी, अमृत योजना 50 लाख, अमृत योजना भुयारी गटार योजनेसाठी 5 कोटी, दलित वस्ती शुधार योजना 3 कोटी, घनकचरा प्रकल्प उभारणी 10 कोटी, यांच्यासह प्राप्त ठेवी अनामत व शासनाच्या वतीने केलेली वसुली 42 कोटी, इतर दायीत्व 14 कोटी असे एकुण 111 कोटी 90 लाख रुपये भांडवली उत्पन्नात सर्शविण्यात आले आहे.