- पंकज पाटील अंबरनाथ/ बदलापूर : मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या होम फलाटाचे काम सुरू करण्यात आले आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक १ ला समांतर फलाट बांधला जात आहे. मात्र पावसामुळे या कामात अडथळा येत होता. मात्र पावसाने विश्रांती घेतल्यावर या कामाला गती देण्यात आली आहे. पाच महिन्यांत हे काम पूर्ण करुन प्रवाशांसाठी तो सुरु करण्यात येणार आहे.अंबरनाथ आणि बदलापूर शहराची लोकसंख्या वाढत असताना त्याचा ताण दोन्ही स्थानकांवर पडत आहे. अंबरनाथ स्थानकाचा विचार करता या स्थानकात फलाट क्रमांक १ आणि २ वर एकत्रित लोकल आल्यावर उतरणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच एकाच पादचारी पुलावर प्रवाशांची गर्दी होत असल्याने त्या ठिकाणी चेंगराचेंगरी होण्याची भीती निर्माण होते. यावर तोडगा काढण्यासाठी अंबरनाथ स्थानकात होम फलाटाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यासाठी आवश्यक जागाही रेल्वेच्या ताब्यात असल्याने प्रशासनाने हे काम सुरु केले होते. मात्र पावसामुळे कामात व्यत्यय येत असल्याने फलाटाचे काम संथ गतीने सुरु होते.आता पावसाने विश्रांती घेताच पुन्हा एकदा कामाला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी वाहणारा स्वामीनगरचा नाला अडचण निर्माण करत असल्याने त्या ठिकाणी पालिकेने आरसीसी भिंत उभारुन रेल्वे प्रशासनाच्या कामाला हातभारही लावला आहे. १२ डब्यांच्या लोकलसाठी आवश्यक असलेल्या फलाट उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.बदलापूरमध्ये होम फलाटाचा प्रस्ताव मंजूर होऊन वर्ष उलटले होते. मात्र ज्या ठिकाणी स्थानकाचे काम करण्याची गरज होती ती जागा व्यापाऱ्यांची असल्याने ती ताब्यात घेण्यासाठी कसरत करावी लागली. व्यापाºयांचा विरोध क्षमविण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले. तर रेल्वे प्रशासनानेही त्यासाठी पुढाकार घेतला आहे. होम फलाट साकारताना व्यापाºयांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्यांची जागा या कामासाठी जाणार आहे, त्यांना भरपाई देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आता काही प्रमाणात अडचणी दूर होण्यास मदत झाली आहे.रस्त्याला समांतर बसवले पत्रेदुसरीकडे बदलापूर होम फलाटाचे काम करण्यासाठी पूर्व भागातील रस्त्याला समांतर असे पत्र बसविण्यात आले आहे. ते काम करत असताना अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. आता पावसाने विश्रांती घेतल्याने या कामालाही वेग आला आहे. चार ते पाच महिन्यात हे काम पूर्ण करुन प्रवाशांसाठी सुरु करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनामार्फत सुरु आहे.
अंबरनाथ - बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:00 AM