- पंकज पाटील, अंबरनाथअंबरनाथ आणि बदलापूर ही दोन्ही शहरे शेजारीशेजारी असल्याने या दोन्ही शहरांकरिता एकत्रित कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याची गरज आहे. दोन्ही शहरे झपाट्याने वाढत असल्याने या दोन्ही शहरांतील कचराही वाढत आहे. त्या कचºयाची विल्हेवाट कशी लावणार, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. दोन्ही पालिकांकडे ओल्या कचºयावर प्रक्रिया करणारी ठोस यंत्रणा नाही. त्यामुळे सर्व कचरा डम्पिंग ग्राउंडवर जात आहे. भविष्यात हाच कचरा दोन्ही शहरांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. तालुक्यातील करवले गावात आता मुंबईचा कचरा टाकला जाणार असल्याने त्याचा दुहेरी त्रास तालुक्याला सहन करावा लागणार आहे.अंबरनाथ शहराची लोकसंख्या ही तीन लाखांच्या घरात आहे, तर बदलापूरची लोकसंख्या अडीच लाखांच्या घरात आहे. या दोन्ही शहरांचे विस्तारीकरण झपाट्याने होत आहे. त्यामुळे लोकसंख्येसोबत कचराही वाढत आहे. या वाढत्या कचºयाचे काय करायचे, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. अंबरनाथ शहराचा विचार करता अंबरनाथ शहरात ओल्या कचºयावर प्रक्रिया करणारी कोणतीच यंत्रणा नाही. २० वर्षांपूर्वी अंबरनाथ पालिकेने ओल्या कचºयापासून खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू केला होता. मात्र, कालांतराने कचरा वेगळा करण्याची यंत्रणाच डबघाईला आल्याने अंबरनाथ पालिकेवर खत प्रकल्प बंद करण्याची नामुश्की आली. त्यामुळे गेल्या १२ वर्षांपासून अंबरनाथ पालिका ओला आणि सुका कचरा एकत्रित गोळा करून तो थेट डम्पिंग ग्राउंडवर टाकत आहे. कचºयावर प्रक्रियाच होत नसल्याने डम्पिंग ग्राउंडची जागा अपुरी पडत आहे. पुन्हा खत प्रकल्प सुरू करण्याचे वेध पालिकेला लागले आहेत. ओल्या कचºयापासून खतनिर्मितीचा प्रस्ताव असला, तरी उर्वरित कचºयाचे काय करणार, हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. सुक्या कचºयापासून राख बनवण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, त्यासाठी २०० ते ४०० टन कचरा आवश्यक आहे. साहजिकच, एकट्या अंबरनाथ पालिकेला हा प्रकल्प सुरू करणे शक्य नाही. त्यासाठी शेजारी असलेल्या शहरांचा कचरा गोळा करणे गरजेचे आहे. मात्र, उल्हासनगर आणि बदलापूरचा कचरा अंबरनाथमध्ये आल्यास त्याचा नागरिकांना त्रास होणार, हे लक्षात आल्याने अंबरनाथ पालिका संभ्रमात पडली आहे. अंबरनाथ पालिकेने कचरा संकलित करण्यासाठी घंटागाडी प्रकल्प सुरू केला. त्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला जात आहे. मात्र, त्यामुळे शहरातील कचरा उचलला गेला. डम्पिंग ग्राउंडवरील ताण वाढला आहे. ज्या ठिकाणी कचरा साठवण्यात येत आहे, ती जागा डम्पिंग ग्राउंडची नाही. भविष्यात अंबरनाथ पालिकेला जांभूळफाटा येथील डम्पिंग ग्राउंडवरच प्रक्रिया केंद्र उभारण्याशिवाय पर्याय नाही. दुसरा पर्याय म्हणजे अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही पालिकांतील कचºयावर प्रक्रिया करणारी यंत्रणा अंबरनाथ पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडच्या जांभूळफाटा येथील आरक्षित केंद्रावर उभारणे. दोन्ही शहरांतील उरलेला कचरा बदलापूरच्या डम्पिंग ग्राउंडवर टाकणे शक्य आहे. दोन्ही शहरांनी एकत्रित कचरा प्रक्रिया केंद्र सुरू केल्यास त्याचा लाभ दोन्ही शहरांना होणार आहे आणि कचºयाचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.बदलापूर पालिकेने कचºयावर प्रक्रिया करणारे यंत्र उभारण्याची तयारी केली आहे. एक प्रकल्प सुरू असल्याचा दावाही पालिका करत आहे. तशाच प्रकारचे दुसरे यंत्र शिरगाव परिसरात सुरू करण्यात येणार आहे. मात्र, लहानलहान प्रकल्प सुरू केले, तरी कचºयाचा १०० टक्के प्रश्न सुटणारा नाही. त्यामुळे कचºयावर प्रक्रि या करणारी मोठी यंत्रणा सुरू करण्याची गरज आहे. बदलापूर शहरात ओला आणि सुका कचरा हा एकत्रित गोळा करण्यात येतो.त्यामुळे प्रकल्पासाठी कोणता कचरा वापरण्यात येतो, याची कल्पना खुद्द पालिकेला आणि नगरसेवकांनाही नाही. कचरा व्यवस्थापनात बदलापूर पालिका दोन पावले मागे असली, तरी महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केल्यास बदलापूर शहरातील प्रश्न निकाली निघण्यासारखा आहे. मात्र, त्यासाठी नगरसेवक आणि प्रशासनाच्या इच्छाशक्तीची गरज आहे. बदलापुरात काही नगरसेवकांनी प्रभागापुरते खतनिर्मिती करणारे प्रकल्प राबवले आहेत. मात्र, हा पर्याय कायमस्वरूपी नाही. बदलापूर पालिकेने घनकचरा व्यवस्थापन योजनेंतर्गत घंटागाड्या विकत घेतल्या आहेत. प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र गाडी घेतल्याने ओला आणि सुका कचरा वेगळा करणे शक्य होणार आहे. मात्र, त्या कचºयावर योग्य प्रक्रिया करणेही गरजेचेआहे.कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा उभारणे, हे एकट्या पालिकेचे काम नसून त्यासाठी शासनाकडून भरीव निधीची गरज आहे. शहरात दोन्ही पालिका आपापल्या परीने प्रयत्न करीत असल्या तरी केंद्र आणि राज्य शासनाकडून त्यांना पाठबळ मिळणे गरजेचे आहे.अंबरनाथ व बदलापूर ही दोन्ही शहरे कचºयाची समस्या सोडवू शकलेली नाहीत. त्यातच, आता मुंबईतील कचरा आणून अंबरनाथ तालुक्यात टाकला जाणार आहे. ओल्या कचºयापासून खतनिर्मिती केली जाऊ शकते.सुक्या कच-यापासून राख निर्माण करण्याचा प्रकल्प ही दोन्ही शहरे एकत्र येऊन राबवतील, तरच कचºयाच्या समस्येवर मात करतील.
अंबरनाथ, बदलापूर पालिका एकत्र येऊन करू शकतात कचऱ्यावर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 3:44 AM