शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
इलॉन मस्क यांनी पुन्हा केलं चकित, स्टारशिप यानातून अवकाशात पाठवली केळी; केला अभूतपूर्व प्रयोग
7
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
8
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
9
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
10
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
11
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
12
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
13
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
14
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
15
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
17
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
18
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
19
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
20
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार

अंबरनाथ, बदलापूरला शिवसेनेचे नगराध्यक्ष, वाळेकर, राऊतांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 2:36 AM

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगराध्यक्षपदांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

अंबरनाथ/बदलापूर :अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगराध्यक्षपदांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. दोन्ही पालिकांमध्ये शिवसेनेने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. अंबरनाथमध्ये मनीषा वाळेकर, तर बदलापूरमध्ये विजया राऊत यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागणार आहे.अंबरनाथ आणि बदलापूरच्या नगराध्यक्षपदांसाठी २१ नोव्हेंबरला निवडणूक घेण्यात येणार होती. शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अंबरनाथमधून वाळेकर, तर बदलापूरमधून राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोन्ही पालिकांमध्ये भाजपा आपला उमेदवार उभा करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. अंबरनाथमध्ये भाजपाने आपला उमेदवार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्तेची गणिते शिवसेनेच्या बाजूने झुकत असल्याचे पाहून भाजपाने शेवटच्याक्षणी उमेदवारी न देता थेट सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला.भाजपा शिवसेनेच्या काही फुटीर नगरसेवकांना घेऊन सत्तेचे गणित रचत असल्याचे पाहून शिवसेनेने काँग्रेसला आमंत्रण दिले. अंबरनाथमधील काँग्रेस शिवसेनेसोबत गेल्याचे पाहून भाजपाने नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेत शिवसेनेला समर्थन जाहीर केले. या राजकीय खेळीमुळे शिवसेनेला नगराध्यक्षपद सहजरीत्या शाबूत ठेवता आले. शिवसेना आणि काँग्रेस यांचा घरोबा झाल्याने आता अंबरनाथ नगरपालिकेत विरोधी पक्षाची भूमिका कोण बजावणार, याची उत्सुकता लागली आहे.शिवसेनेने काँग्रेसला सोबत घेतल्याने उपनगराध्यक्षपद हे काँग्रेसला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अंबरनाथची राजकीय परिस्थिती पाहता सद्य:स्थितीत पालिकेत सर्वच पक्ष सत्ताधारी म्हणून पुढे आले आहेत. अंबरनाथमध्ये वाळेकर गटाच्या वाट्याला नगराध्यक्षपद गेल्याने वारिंगे गटात नाराजीचा सूर उमटला होता. पक्षाचा आदेश मान्य असला, तरी आम्हाला विश्वासात घेतले नाही, अशी ओरड वारिंगे गटाकडून केली जात होती. शिवसेनेत नगरसेवक फुटू नये, म्हणून सर्वच्या सर्व नगरसेवकांना आपल्या नजरकैदेत ठेवले होते. शिवसेनेतील नाराज गटाला सोबत घेऊन भाजपाने काही नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्नदेखील केला होता. मात्र, त्यांचे मनसुबे उधळून लावण्याचे काम शिवसेनेच्या नगरसेवक, नेत्यांनी केले आहे. अनेक दिवसांपासून असलेले तणावाचे वातावरण नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर थंड झाले आहे.दुसरीकडे बदलापूरमध्येही निवडणुकीत चुरस पाहायला मिळाली. या ठिकाणीही भाजपा शिवसेनेच्या नाराज गटाला सोबत घेऊन सत्तेचे स्वप्न पाहत होती. मात्र, शिवसेनेच्या अंतर्गत वादाला पूर्णविराम मिळताच भाजपाने आपली रणनीती बदलली. शिवसेनेने आपले वाद परस्पर मिटवून घेतल्याने याठिकाणी निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झाले.>दरम्यान, भाजपाने आपली भूमिका स्पष्ट करत युतीचा धर्म पाळल्याचे स्पष्ट केले आहे. शहरप्रमुख संभाजी शिंदे यांनी ठरल्याप्रमाणे आम्ही शिवसेनेला मदत केल्याचे सांगितले. शिवसेना आणि भाजपा एकत्रित बदलापूरच्या विकासासाठी सहकार्य करेल, असेही ते म्हणाले. शिवसेनेने केलेल्या कामाच्या जोरावरच या पालिकेत सेनेचे निर्विवाद वर्चस्व असल्याचे मत शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :badlapurबदलापूर