शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Ambernath:...पण वेळ आली नव्हती, मातीचा ढिगारा कोसळल्याने खड्ड्यात अडकलेल्या मजुरांची सुखरूप सुटका

By पंकज पाटील | Published: September 06, 2023 5:46 PM

Ambernath: अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरात महानगर गॅसच्या लाईनीचे दुरुस्तीचे काम करीत असताना खोदण्यात आलेल्या 15 फूट खोल खड्ड्यात मातीचा ढिगारा पडल्याने खड्ड्यात काम करणारे तीनही कामगार मातीच्या ढिगार्‍यात रुतले होते.

- पंकज पाटीलअंबरनाथ - अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरात महानगर गॅसच्या लाईनीचे दुरुस्तीचे काम करीत असताना खोदण्यात आलेल्या 15 फूट खोल खड्ड्यात मातीचा ढिगारा पडल्याने खड्ड्यात काम करणारे तीनही कामगार मातीच्या ढिगार्‍यात रुतले होते. अग्निशामक दलाच्या मदतीने या तीनही कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे आणि त्यांना उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

फॉरेस्ट नाका येथे महानगर गॅसचे मोठे स्टेशन असून या ठिकाणावरून संपूर्ण शहराला महानगर गॅसचा पुरवठा केला जातो. या स्टेशनवर येणारी मुख्य महानगर गॅसची लाईन दुरुस्तीचे काम करीत असताना 15 फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता. या खड्ड्यातील भले मोठे दगड देखील बाहेर काढून ठेवण्यात आले होते. खड्डा खोदत असतानाच रस्त्याच्या वरती ठेवण्यात आलेल्या मातीचा ढिगारा अचानक कोसळला आणि खड्ड्यात काम करणाऱ्या तीन कामगारांच्या अंगावर पडला.

या मातीसोबत भले मोठे दगड देखील पडल्याने हे तीनही कामगार कमरेपर्यंत मातीत रुतले होते. सुरेश मोरे, कालीचंद्र आणि लक्ष्मण यमकर असे तीनही कामगारांचे नाव असून त्या तीनही कामगारांना वाचवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना प्रयत्न करावे लागले. खड्ड्यात पडलेले भले मोठे दगड जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करून मातीचा ढिगारा अलगदपणे काढण्यात आला आणि त्यानंतर त्या कामगारांना सुखरूप पणे बाहेर करण्यात आले आहे. महानगर गॅसच्या लाईनच्या दुरुस्तीचे काम करताना कामगारांना सुरक्षेची साधने न पुरवल्याने आता महानगर गॅस च्या विरोधात देखील संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथ